एकंदरीत जे नुकसान झालंय ते भरून निघणं कठीण आहे

संतोष टाकळे 
Wednesday, 1 July 2020

पण या पंधरादिवसात आम्ही ज्या वाडीत ज्या बागेत श्रमदान केलं तिथं प्रकर्षाने आम्हाला स्थानिक तरुणांचा सहभाग कमी जाणवला कारण काहीही असो पण या कठीण प्रसंगी इथल्या तरुणांना एक संधी होती जिथे त्यांना लोकांना पुन्हा उभं करण्यासाठी पुढं येता आलं असतं असो.

गेले पंधरा दिवस आम्ही दापोली तालुक्यातल्या काही गावात श्रमदान अन्नधान्य वाटप करतो आहोत. पण काल रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने काल आम्हाला श्रमदान थांबवायला लागलं अर्थात प्रशासनाचे नियम डावलून आम्ही कोणतीही मदत कार्य करू इच्छित नाही.

पण या पंधरादिवसात आम्ही ज्या वाडीत ज्या बागेत श्रमदान केलं तिथं प्रकर्षाने आम्हाला स्थानिक तरुणांचा सहभाग कमी जाणवला कारण काहीही असो पण या कठीण प्रसंगी इथल्या तरुणांना एक संधी होती जिथे त्यांना लोकांना पुन्हा उभं करण्यासाठी पुढं येता आलं असतं असो.

एकंदरीत जे नुकसान झालंय ते भरून निघणं कठीण आहे खूप काळ लागेल या सगळ्याला अर्थात ही सगळी गावं तब्बल वीस एक वर्ष मागे गेली आहेत. स्वतःच्या हाताने लावलेली झाडं त्याच हाताने तोडतांना अनेकांचे डोळे पाणावले अगदी आम्हालाही त्याचं दुःख पाहून काय करावं सुचेना अशावेळी आम्ही तरी त्यांना काय धीर देणार. आम्ही केवळ आम्हाला शक्य आहे तितकी मदत करण्यासाठी प्रयत्न करीत होतो. आलेल्या टिम्स प्रामाणीक पणे प्रयत्न करत होत्या. त्यांची अजून काही दिवस श्रमदान करण्याची इच्छा आणि तयारी असूनही प्रशासनाच्या निर्णयामुळे आम्हाला इथं थांबावं लागलं.
पण पुन्हा ह्या सगळ्या टिम्स यायला तयार आहेत आणि सोबत आणि नव्या टिम्स घेऊन यायला देखील ते तयार असल्याचं सांगून त्यांनी काल दापोली सोडली.

अर्थात अजून सहा महिने या टिम्स आल्या तरी इथलं काम संपणार नाही. पण हे सगळं घडून आलं ते दापोलीतले लेखक आणि जेष्ठ विचारवंत विकास घारपुरे सर आणि सामाजिक कार्यकर्ते समीर साने दादा यांच्या अथक प्रयत्नातून म्हणजे नुसत्या टिम्स बोलवुन भागात नाही त्यांची राहण्या खाण्याची व्यवस्था त्यांचं योग्य नियोजन ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण अतिशय कठीण काम यांनी व्यवस्थित निभावलं.

पण खरंतर इथे काम संपलेलं नाही अजून काम बाकी आहे. ज्यांनी मदत पाठवली आहे त्यांची मदत योग्य लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी आहेच. आमच्या वर तेंव्हा काळजी नसावी पण तोवर इथल्या स्थानिक लोकांनी मात्र आता एकमेकांना साथ देत तोवर उभं राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण कोणी मदतीला येईल तेंव्हा येईल तोपर्यंत आपण किमान यातून उभं राहण्यासाठी स्वतः प्रयन्त केले पाहिजेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News