एलजीबीटीक्यूसाठी आऊट अँड लाऊड पुणे इंटरनॅशनल क्विअर फिल्म फेस्टिव्हल सुरू

सलील उरुणकर
Sunday, 6 September 2020

पुण्यात सुरू झाला आहे 'आऊट अँड लाऊड पुणे इंटरनॅशनल क्विअर फिल्म फेस्टिव्हल'. २७ सप्टेंबरपर्यंत नवे चित्रपट, लघुपट व मूकपट हे ओटीटी प्लॅटफाॅर्मवरून पाहण्याची सोय या महोत्सवामध्ये करण्यात आली आहे.

पुणेः समलिंगी संबंधांबाबत असलेलं भारतीय दंड संहितेचं ३७७ कलम रद्द ठरवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आज दोन वर्ष पूर्ण झाली. लेस्बियन, गे, बायसेक्स्शुअल, ट्रान्सजेंडर आणि क्विअर (एलजीबीटीक्यू) समाजातील अनेकांसाठी हा दिवस स्वातंत्र्यदिनापेक्षा कमी महत्त्वाचा नाही. या दिवसाच्या निमित्ताने पुण्यात सुरू झाला आहे 'आऊट अँड लाऊड पुणे इंटरनॅशनल क्विअर फिल्म फेस्टिव्हल'. २७ सप्टेंबरपर्यंत नवे चित्रपट, लघुपट व मूकपट हे ओटीटी प्लॅटफाॅर्मवरून पाहण्याची सोय या महोत्सवामध्ये करण्यात आली आहे.

महोत्सवाचे आयोजक श्याम कोण्णूर म्हणाले, "आपण समलैंगिक आहोत हे आपल्या कुटुंबियांना पटवून देणे किंवा मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना सांगणे हे एक प्रकारचे आव्हानच असते. आजही सोशल मीडियावरून याचे समर्थन करणारे प्रत्यक्षात मात्र मोकळेपणाने या विषयांवर बोलण्यास टाळतात. त्यामुळेच या चित्रपट महोत्सवाचे एक वेगळे महत्त्व आहे. महोत्सवाचे यंदाचे चौथे वर्ष आहे. लाॅकडाउन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या निकषांमुळे हा महोत्सव यावर्षी प्रत्यक्षात आयोजित करणं शक्य नव्हतं. म्हणूनच हा महोत्सव आता आॅनलाईन उपलब्ध करून दिला आहे."

महोत्वातील चित्रपट पाहण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. आतापर्यंत सुमारे २५० जणांनी ही नोंदणी केली आहे. नोंदणी केल्यानंतर एक सर्व्हे लिंकसुद्ध दिली जात आहे ज्याद्वारे तुम्हाला आवडलेल्या चित्रपटासाठी तुम्ही लाईक करू शकता, असेही कोण्णूर यांनी सांगितले.

महोत्सवाचे उदघाटन 'मिस मॅन' या बंगाली चित्रपटाने करण्यात आले आहे. हा चित्रपट फक्त दोन दिवस म्हणजे सात सप्टेंबरपर्यंत लोकांना पाहता येणार आहे. उर्वरित सर्व चित्रपट २७ सप्टेंबरपर्यंत केव्हाही कितीहीवेळा पाहता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चित्रपट पाहण्यासठी लिंक - www.lgbtq.co.in/outloudpiqff/

चित्रपटांची नावे (भाषा - कालावधी)

- ए बिग फॅट तायवानिज सेम-सेक्स वेडिंग बँक्वेट (मॅडरिन चायनीज - ५ मिनिटे)
- सायलन्ट टाईज (हिंदी, इंग्लिश - १० मिनिटे)
- प्रिटी बाॅय (इंग्लिश - १० मिनिटे)
- वन मोअर प्लिज (इंग्लिश - ६ मिनिटे)
- टच (इंग्लिश - ४ मिनिटे)
- डिक्स पिक्स (इंग्लिश - ४ मिनिटे)
- हर (इंग्लिश - ३ मिनिटे)
- दीज पेक्युलिअर डेज (स्पॅनिश, पोलिश - १ तास ३८ मिनिटे)
- मरी (१ तास ३८ मिनिटे)
- अनकंडिशनल (इंग्लिश - १० मिनिटे)
- काॅफी कॅफे (तमीळ - २ तास ७ मिनिटे)
- पेन्सिल बाॅक्स (हिंदी - ३० मिनिटे)
- फ्रुटी (मूक - २ मिनिटे)
- दी फादर्स प्रोजेक्ट - व्हाॅट इफ एड्स नेव्हर एक्झिसटेड (४० मिनिटे)
- स्विव्हल (इंग्लिश - ७ मिनिटे)
- चेअर अमोर (९ मिनिटे)
- क्रश (१६ मिनिटे)
- लोलो (१४ मिनिटे)
- नाॅट फनी (१ मिनिट)
- स्टिल हिअर (१३ मिनिटे)
- एक्सवाय (१५ मिनिटे)
- बाॅर्न टू बी (१ तास ३२ मिनिटे)
- फेरिआॅशियस (फ्रेंच - १४ मिनिटे)
- पोएट्री नाईट (इंग्लिश - ९ मिनिटे)
- पल्स (इंग्लिश - २७ मिनिटे)
- इज युवर टीन ए होमोसेक्शुअल? (इंग्लिश - ६ मिनिटे)
- ओरीन अँड अँटो (इंग्लिश - २० मिनिटे)
- सेव्हन ड्रिंक्स (इंग्लिश - १५ मिनिटे)
- ब्युटी बाॅईज (फ्रेंच - १८ मिनिटे)
- फिकस (बोसनियन - १८ मिनिटे)
- रिव्हिल (इंग्लिश - २५ मिनिटे)
- आऊटकास्ट (हिंदी, इंग्लिश - १ तास ५२ मिनिटे)
- बातें (हिंदी, इंग्लिश - २१ मिनिटे)
- डेज आॅफ रेज (फ्रेंच, अरबी - २० मिनिटे)
- गे अॅज इन हॅपी - ए क्विअर अँटी-ट्रॅजिडी (इंग्लिश - ४ मिनिटे)
- प्रिझन (मूक - ११ मिनिटे)
- बाॅक्स्ड (इंग्लिश, हिंदी, कन्नड, तेलगु - १ तास ८ मिनिटे)
- समव्हेर इन बिटवीन (इंग्लिश - १० मिनिटे)
- ट्रीएकल (इंग्लिश - १८ मिनिटे)
- थँक यू सोनाली (१२ मिनिटे)
- आय अॅम संजो (मल्याळम - १५ मिनिटे)
- माँ (इंग्लिश - ८ मिनिटे)
- सबस्टन्स (तेलगु - ४० मिनिटे)
- दी राॅजर्स (१७ मिनिटे)
-  रिक्लेमिंग प्राईड (इंग्लिश - २५ मिनिटे)
- ट्रूथ (टर्किश - १४ मिनिटे)
- फोर सिझन्स (मूक - १५ मिनिटे)
- इट्स स्टिल मी, माॅम (इंग्लिश - १२ मिनिटे)
- हेवन (इंग्लिश - ७ मिनिटे)
- स्टाॅल्स (इंग्लिश - ४ मिनिटे)
- सिंग्युलरः दी क्वीव आॅफ सक्सेस (हिंदी, इंग्लिश - ३१ मिनिटे)
- व्हिजिटर्स लाॅगइन (हिंदी, इंग्लिश - १५ मिनिटे)
- ग्लान्सेस (इंग्लिश - ७ मिनिटे)
- ड्रिम बाॅय (२८ मिनिटे)
- इफ यु डेअर डिझायर (बंगाली - ५२ मिनिटे)
- आय नो हर (इंग्लिश - ३ मिनिटे)
- वन स्टँडिंग नाईट (हिंदी - ११ मिनिटे)
- स्टीअर युवर टाईप (हिंदी, इंग्लिश - २३ मिनिटे)
- बाॅडीस्केप्स (मल्याळम - १ तास ४० मिनिटे)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News