आमचे नेमबाज तयार आहेत... 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 February 2020

१५ ते २६ मार्चदरम्यान नवी दिल्लीत होत असलेल्या या स्पर्धेत खेळण्यास आमचे नेमबाज तयार आहेत, त्यामुळे तुम्ही स्पर्धेची नेमकी स्थिती काय आहे, अशी विचारणा दक्षिण कोरिया नेमबाजी फेडरेशनने भारतीय रायफल संघटनेकडे केली आहे.

नवी दिल्ली :  कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर पुढील महिन्यात होणाऱ्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेसाठी पूर्व आशियाई देशांच्या सहभागाबद्दल आपली भूमिका काय आहे, अशी विचारणा दक्षिण कोरियाच्या नेमबाजी संघटनेने भारतीय नेमबाजी संघटनेकडे केली आहे.

१५ ते २६ मार्चदरम्यान नवी दिल्लीत होत असलेल्या या स्पर्धेत खेळण्यास आमचे नेमबाज तयार आहेत, त्यामुळे तुम्ही स्पर्धेची नेमकी स्थिती काय आहे, अशी विचारणा दक्षिण कोरिया नेमबाजी फेडरेशनने भारतीय रायफल संघटनेकडे केली आहे. तसे पत्र कोरिया फेडरेशनचे सरचिटणीस योंगजेई ली यांनी भारतीय संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांना लिहिले आहे. या स्पर्धेतून कमीत कमी पात्रता निकष गाठण्यासाठी कोरियाचे नेमबाज उत्सुक आहेत. आम्ही नेमबाजांच्या प्रवासाचे तिकीटही आरक्षित केले असून व्हिसाचे पैसेही भरलेले आहेत, असेही ली यांनी स्पष्ट केले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News