आमच्या पाच वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये मी मोठी, तो लहान...

रसिका जाधव (यिनबझ)
Tuesday, 23 April 2019

हो खरच... असंच काहीसं आमच्या दोघांमध्ये आहे. वयाचा विचार केल्यास आमच्यातला फरक असा काही वेगळा आहे, ज्यात मी मोठी आणि तो वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. तरीही आमच्या नात्यात असलेला गोडवा सांगण्यासाठी हा लेख खास, त्याच्यासाठी..

हो खरच... असंच काहीसं आमच्या दोघांमध्ये आहे. वयाचा विचार केल्यास आमच्यातला फरक असा काही वेगळा आहे, ज्यात मी मोठी आणि तो वयाने माझ्यापेक्षा लहान आहे. तरीही आमच्या नात्यात असलेला गोडवा सांगण्यासाठी हा लेख खास, त्याच्यासाठी...

कॉलेजचे आयुष्य हे एक वेगळंच असतं. नवीन मित्र, नवीन ओळख, नवी नाती, नवे चेहरे सगळंच नवं; पण एक गोष्ट आहे, ती म्हणजे, सगळेच म्हणत असतात, की कॉलेजमध्ये गेलो की मुलं-मुली प्रेमात पडतात. पण माझा त्यावेळी असाच एक भाबडा प्रश्न होता, की प्रेम म्हणजे काय? हे तर मला माहितही नव्हतं आणि ते जाणून घेण्यात काही रसही नव्हता. 

कॉलेज सुरू झालं हळू-हळू दिवस जाऊ लागले, नव्या ओळखी होऊ लागल्या. नवीन मित्र बनू लागले, मित्र हे आयुष्यतील एक महत्वाचा भाग असतात आणि माझ्याही आयुष्यात आहेतच, पण याच मित्रांमध्ये एक 'तो' देखील होता.

तो आणि मी चांगले मित्र-मैञिण होतो. आमच्या मैत्रीचे नंतर हळू-हळू प्रेमात रुपांतर होऊ लागले, ते आम्हाला जाणवू लागलं होत. त्यामुळे मी त्याच्यापासून लांब राहू लागली... कारण मी त्याच्यापेक्षा वयाने मोठी होती. तब्लल 1 वर्ष 2 महिने आणि 1 दिवस..  एवढे अंतर होते आमच्यात. माझी जन्म तारिख 9 जून आणि त्याची 10 ऑगस्ट. मला भिती होती की, प्रेमामुळे आमची मैत्री तुटली तर? मग आम्ही ठरवलं की, आता आपण बोलायच नाही आणि आम्ही एकमेकांना बॉल्क केलं. 

1-2 तासात मला त्याचा कॉल आला आणि तो बोलु लागला... तू मला अनबॉल्क कर, मला त्रास होत आहे. मग मी त्याला अनबॉल्क केलं कारण मला पण त्रास जाणवत होता.

1 महिन्यानंतर त्याने मला लग्नासाठी मागणी घातली. मी त्याला नकार दिला. त्याने मला नकाराचं कारण विचारलं. तेव्हा मी बोलली की, आता आपण 12वीला आहोत, म्हणून नको. पण यावर त्याच उत्तर काही औरच होतं... तो म्हणाला की, आपल्या या रिलेशनशिपमुळे आपल्या अभ्यासावर काहीच परिणाम होणार नाही. मग मी परत दुसरं कारण सांगितलं. ते म्हणजे मी मोठी आहे आणि तू लहान आहेस, त्यामुळे हे शक्य होऊ शकत नाही.

मी सांगितलेल्या या उत्तरानंतर त्याने जे मला उत्तर सांगितलं होत, ते खरंच मनाला भावणारं होतं. ते काहीसं असं होतं... 
प्रेमामध्ये कोणतंच वय मॅटर नाही करत. ती मोठी, तो लहान असं काहीच नसतं. आपली मनं जुळतात ते महत्वाचं आहे. तरीही माझा त्यावर प्रश्न होताच की, समाज हे मान्य करणार नाही...

याच्यावरही त्याचं उत्तर तयार होतंच पण, तो म्हणाला की, सचिन तेंडूलकर आणि त्याची बायको यांच्यामध्ये तब्बल 6 वर्षाचा फरक आहे. तरीही अख्खा समाज त्यांच्या नात्याला समाजाला मान्यता दिलीच ना... 

इतकं त्याने मला समजावलं, तरी, मी माझ्या 'नाहीच'.. या  निर्णयावर ठाम होते... मग थोड्या दिवसांनी त्याने पुन्हा मला विचारलं. मग मी विचार केला आणि त्यावेळेला होकार दिला... माझ्या काही मित्र-मैत्रिणींना ते पटलं नाही... तर काहीजण बोलले की, जास्त दिवस नाही तुमची रिलेशनशिप टिकणार. त्यानंतर मला प्रश्न पडला की, असं का बोलतात सगळे? आणि उत्तर मिळाले की, मुली या मुलापेक्षा जास्त मॅच्यूअर असतात. त्यामुळे लग्न करताना मुलगी लहान व मुलगा मोठा बघतात. कारण विचारात मतभेद होऊ नये म्हणुन. पण आमच्या आजपर्यंतच्या रिलेशनला बघितलं तर या सगळ्या आमच्यासाठी अफवाच आहेत...

आता आम्ही दोघपण रिलेशनशिपमध्ये आहोत, आमच्या रिलेशनशिपला आज 5 वर्ष पूर्ण होऊन प्रेमाची 6 वर्षे लागली आहेत. तो लहान असला तरीसुध्दा मला खूप समजून घेत असतो. आमच्या प्रेमात आमची मैत्रीसुध्दा टिकून आहे. मला प्रेम काय? ते कस असत? या सगळ्यांची जाणवी करून देणारा तोच आहे आणि आता तोच माझा जीव आणि श्वास आहे.

काही दिवस झाले आमच्यात माझ्या काही कारणांना घेऊन वाद सुरू आहेतच, पण ते वाद आमच्या आयुष्यभराच्या नात्याला तोडू शकणार नाहीत, हेही तितकच महत्वाचं आहे... आमचं रिलेशन, त्याच्या आईची असलेली आम्हा दोघांना साथ आणि आमचा एकमेकांवर असलेला विश्वास हा आयुष्यभर असाच असेल आणि त्याची जबाबदारी आम्हा दोघांची आहे, हे नक्की.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News