पाथराज आश्रमशाळेत विद्यार्थ्यांनी गिरवले आत्मरक्षणाचे धडे

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Friday, 6 March 2020

आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्पांतर्गत कर्जत तालुक्‍यात चार निवासी आश्रमशाळा आहेत. त्यापैकी पाथरज आश्रमशाळा येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली होती.

नेरळ : आजच्या युगात विद्यार्थ्यांना सुरक्षित जीवनाचे धडे महत्त्वाचे आहेत. विद्यार्थी दशेतच ते त्यांना दिले गेले पाहिजे, असा सल्ला आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी दिला आहे. कर्जत तालुक्‍यातील पाथरज शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आदिवासी विकास विभागाच्या पेण प्रकल्पांतर्गत कर्जत तालुक्‍यात चार निवासी आश्रमशाळा आहेत. त्यापैकी पाथरज आश्रमशाळा येथे आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यावेळी जयपाल पाटील, नेरळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश पाटील, पाथरज शाळा मुख्याध्यापक रमेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

कुठेही अपघात झाल्याचे किंवा आपल्या आजूबाजूला कुणा महिलेला प्रसूतीवेदना होत असतील तर १०८ ही रुग्णवाहिका सेवा आपल्याला सरकारकडून मोफत मिळते. या रुग्णवाहिकेत एक डॉक्‍टर व सहायक उपलब्ध असतो. त्याचबरोबर औषधेही रुग्णवाहिकेत उपलब्ध असतात, अशी माहिती जयपाल पाटील यांनी दिली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News