वस्त्रालंकारित लटकन

शलाका सावंत 
Tuesday, 2 July 2019

पारंपरिक पोशाख म्हटलं की, कधीकधी त्यात तोचतोचपणा येतो. साडी, चनिया चोली, घागरा, लेहंगा, पंजाबी ड्रेस, चुणीदार हे असं प्रांतिक वैविध्य असलं, तरीही एक साचेबद्धता येते. मग यामध्ये जरा वेगळेपण आणण्यासाठी आपण एखाद्या ॲक्‍सेसरीजकडे वळतो. हल्ली पारंपरिक पोशाखाला अधिक देखणेपणा आणण्यासाठी ‘लटकन’चा वापर होत आहे.  

पारंपरिक पोशाख म्हटलं की, कधीकधी त्यात तोचतोचपणा येतो. साडी, चनिया चोली, घागरा, लेहंगा, पंजाबी ड्रेस, चुणीदार हे असं प्रांतिक वैविध्य असलं, तरीही एक साचेबद्धता येते. मग यामध्ये जरा वेगळेपण आणण्यासाठी आपण एखाद्या ॲक्‍सेसरीजकडे वळतो. हल्ली पारंपरिक पोशाखाला अधिक देखणेपणा आणण्यासाठी ‘लटकन’चा वापर होत आहे.  

सध्या साडीच्या पदराला व ब्लाऊजला लटकन लावण्याची फॅशन इन आहे. उत्सवांमध्ये ब्लाऊजच्या मागच्या बाजूला लटकन लावून मिरवणाऱ्या मुली तुम्हाला दिसतील. ब्लाऊजला वेगळ लूक देण्याचे काम हे लटकन करतात. केसांची हेअरस्टाईल अशी असते की ज्याने त्यांची महागडी किंवा स्वस्त लटकन सगळ्यांच्या नजरेत भरेल. केसांचा अंबाडा घालतात किंवा बटा सोडून वर बांधल्या जातात. अशा प्रकारे खास लटकन मिरविण्यासाठी केसांच्या वेगवेगळ्या रचना केल्या जातात. एकंदरीत काय, तर लटकन दिसायला हवी.

प्रकार
बाजारांमध्ये असंख्य प्रकाराचे लटकन उपलब्ध आहेत. त्यामध्ये रंगीबेरंगी मण्यांचा वापर करून तयार केलेले लटकन; तसेच धातूंपासून तयार केलेल्या कलाकृतीं, गोंडे यांसारखे असंख्य प्रकार सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पूर्वी ब्लाऊजच्या उरलेल्या कापडापासून त्रिकोणी आकाराचा गोंडा तयार करून तोच ब्लाऊच्या नाडीला लावला जात होता; मात्र आता हीच संकल्पना वेगळ्या प्रकारे अंमलात आणून काही डिझायनर्सनी कापडाचे छोटे मोर, चिमण्या, पोपट, हत्तीच्या डिझाईनच्या आधारे वेगवेगळ्या आकाराचे लटकन तयार केले आहेत. 
कुठे वापरू शकता? 

लटकन फक्त कुर्तीवर किंवा ब्लाऊजवरच लावू शकतो, असा साधारण विचार असतो. पण हा विचार अगदी चुकीचा ठरताना दिसतो आहे. आता आकर्षक लटकननी आपली एक वेगळी ओळख निर्माण करून सर्व प्रकारच्या वस्त्रांना आपलेसे केले आहे. आपल्याला हे लटकन घागऱ्यावर, कुर्तीवर, ब्लाऊजवर, पदराला, स्कार्फलाही वापरता येतात. लटकनमध्ये सध्या भरपूर व्हरायटी बघायला मिळतेय. फक्त आकारामध्येच नाही; तर रंगांमध्येदेखील वैविध्य दिसून येतंय. रंगांमध्ये निऑन कलर्स मोठ्या प्रमाणावर दिसताहेत. सध्या टी-शर्ट असो किंवा हेअर क्‍लिप्स; सगळ्यांवर निऑन कलरचं राज्य आहे. मागील वर्षी गणपतीचे पितांबरदेखील निऑन कलरचं पाहायला मिळालं, मग लटकनने तरी का मागे राहावं? वेगवेगळ्या आकाराचे कलरफुल लटकन तुमच्या प्लेन कुर्तीला अगदी आकर्षक आणि फ्रेश बनवतात, हे नक्की.

लटकन निवडताना... 
बाजारात लटकनचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. त्यामध्ये काही हलके; तर काही अगदीच वजनदार असतात. त्यामुळे कोणते लटकन कुठे वापरावेत, याची विशेष काळजी घ्यावी. ब्लाऊज अगदीच हेवी असल्यास त्यावर जड असे हिऱ्यांचे किंवा मोत्यांचे लटकन शोभून दिसतात. तसेच घागऱ्यासाठी लटकन निवडताना चोळीच्या रंगाशी साम्य असणारे किंवा घागऱ्याच्या बॉर्डरच्या रंगाचे लटकन घ्यावेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News