अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 2 August 2020
  • लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी "संभाषण' या ई-नियतकालिकेच्या अण्णाभाऊ साठे विशेषांकाचे प्रकाशन, तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित वेबिनारचे उद्‌घाटन मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.

मुंबई:  मुंबई विद्यापीठाच्या शाहीर अमरशेख अध्यासन, लोककला अकादमी, मानव्य विद्या शाखा आणि पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. 1) लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात आली. याप्रसंगी "संभाषण' या ई-नियतकालिकेच्या अण्णाभाऊ साठे विशेषांकाचे प्रकाशन, तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित वेबिनारचे उद्‌घाटन मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
अण्णाभाऊ हे क्रांतीच्या धगधगत्या होमकुंडातून आलेलं कलंचे एक वेगळं भान आहे, असे या वेळी डॉ. बाबूराव गुरव म्हणाले. अण्णाभाऊंचा घडलेला सहवास आणि त्यातून आलेला अनुभव या वेळी त्यांनी व्यक्त केला. शाहीर संभाजी भगत यांनी दौलतीच्या राजा, उठून सर्जा, हाक दे शेजाऱ्याला रं, शिवारी चला हे अण्णा भाऊंचे गीत आपल्या बहारदार आवाजात सादर केले.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. विनोद पाटील, मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. राजेश खरात आणि पश्‍चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे कार्यक्रम अधिकारी सोडा उपस्थित होते.

कविसंमेलनाची रंगत
अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विकास प्रबोधिनी संस्थेच्या वतीने ऑनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते.ज्येष्ठ साहित्यिक ऍड. श्रीकृष्ण टोबरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. या वेळी भटू जगदेव, ऍड. प्रज्ञेश सोनावणे, ऍड. श्रीकृष्ण टोबरे, नवनाथ रणखांबे, मिलिंद जाधव, संघरत्न घनघाव, मारुती कांबळे, सुरेखा गायकवाड, नरेश जाधव, मनीषा मेश्राम, राष्ट्रपाल काकडे, चेतन जाधव यांनी आपल्या कविता सादर करीत लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News