ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन; 17 हजार जागांसाठी भरती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 5 July 2020

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 जुलै 2020 या कालावधीत; तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी 8 ते 12 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत विविध कामे करणाऱ्या कंत्राटदार यांच्याकडील सुमारे 17 हजार पदांची भरती होणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात दोन हजार 923 पदांची भरती केली जाणार असून, ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाने 6 ते 8 जुलै 2020 या कालावधीत; तर मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या कार्यालयांनी 8 ते 12 जुलै 2020 या कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 06 वाजता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.

सध्यस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यांतून बरेचसे कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगार स्थलांतरित झाले आहेत; मात्र मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याअंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे सुमारे 17 हजार गवंडी, सुतारकाम, फिटर (स्टील फिक्‍सिंग करणारे), फिटर (बार बेंडिंग व फिक्‍सिंग करणारे), वेल्डर, इलेक्‍ट्रिशियन व वायरमन अशा शैक्षणिक पात्रतेच्या कुशल आणि अकुशल कामगार (श्रमिक) मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. ही रिक्त पदे मुख्यत: मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातील आहेत. याबाबतची माहिती विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेब पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही रिक्त पदे भरण्याकरिता कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.

समस्या असल्यास संपर्क

रिक्त पदांची माहिती, वेब पोर्टलवर नोंदणी अथवा अर्ज करण्यासाठी काही समस्या येत असल्यास विभागाच्या जिल्हा स्तरावरील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दूरध्वनीवर अथवा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी केले आहे. राज्यातील संबंधित जिल्ह्यांतील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे पत्ते व दूरध्वनी क्रमांक https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेब पोर्टलवर उपलब्ध आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News