गरीमा फाऊंडेशनद्वारे ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन; तरुणाईने घेतला उत्स्फुर्त सहभाग

 अजिंक्य मेटकर
Friday, 17 April 2020
  • गरीमा फाऊंडेशनने  9 एप्रिल ते 12 एप्रिल या दरम्यान राजस्तरीय ऑनलाईन विषय अध्ययन (Case study) स्पर्धा आयोजित केली.

अमरावती : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन असतांना विद्यार्थ्यांना लॉकडाऊन काळात काही नवीन शिकायला मिळावं या संकल्पनेतून स्थानिक गरीमा फाऊंडेशनने  9 एप्रिल ते 12 एप्रिल या दरम्यान राजस्तरीय ऑनलाईन विषय अध्ययन (Case study) स्पर्धा आयोजित केली होती. 

या स्पर्धेमध्ये अमरावती, नागपूर, पुणे, यवतमाळ, अकोला, बुलढाणा येथील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेमध्ये विविध पुरस्कार गरीमा फाऊंडेशन तर्फे देण्यात आले ज्यामध्ये प्रथम पुरस्कार 2 हजार, सन्मानचिन्ह आणि पुस्तक, तसेच द्वितीय पुरस्कार 1 हजार 500 रुपये सन्मानचिन्ह आणि पुस्तक, तृतीय पुरस्कार 1000 रुपये सन्मानचिन्ह आणि पुस्तक देण्यात आले. त्याचबरोबर प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आले. 

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक डॉ. आंबेडकर व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूर येथील भूषण उमाळे या विद्यार्थ्याने पटकाविले, द्वितीय पारितोषिक सिपना कॉलेज, अमरावती येथील ईशिका साहू हिने पटकाविले, तृतीय पारितोषिक के. एल. कॉलेज येथील पियुष भारसाकळे याने पटकाविले त्याचबरोबर वैष्णवी गुल्हाणे ( विद्याभारती महाविद्यालय), प्रणय गुल्हाणे ( शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालय), रुचिका सवई आणि साक्षी खोब्रागडे ( डॉ. आंबेडकर व्यवस्थापन महाविद्यालय, नागपूर) यांना प्रोत्साहनपर पारितोषिक मिळाले. गरीमा फाऊंडेशन शिक्षण क्षेत्रात अशा प्रकारचे अनेक उपक्रम सतत राबवत असतात. या स्पर्धेच्या यशामध्ये फाऊंडेशन च्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News