रोजगार मेळाव्याचे आयोजन; ३ हजार ४०२ जागांसाठी ऑनलाईन भरती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 20 September 2020

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग विभागाने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. त्यामुळे शारिरीक अंतर नियम पाळले जाणार आहे, ऑनलाईनमुळे घरी बसून एका क्लिकवर उमेदवरांना रोजाराची संधी मिळणार आहे, त्यामुळे प्रवास खर्च, वेळ आणि मानसिक ताण कमी होणार आहे.   

मुंबई : तरुणाईला रोजगर उपलब्ध करुन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने प्रयत्न सुरु केले. राज्यातील संपुर्ण जिल्ह्यात पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मोळाव्याचे आयोजन केले. रोजगार मेळाव्याला तरुणाईचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुन्हा एकादा मुबंईत ३ हजार ४०२ जागांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. हा मेळावा १८ सप्टेंबला सुरु झाला. २३ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त छाया कुबल यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गर्दी टाळण्यासाठी उद्योग विभागाने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले. त्यामुळे शारिरीक अंतर नियम पाळले जाणार आहे, ऑनलाईनमुळे घरी बसून एका क्लिकवर उमेदवरांना रोजाराची संधी मिळणार आहे, त्यामुळे प्रवास खर्च, वेळ आणि मानसिक ताण कमी होणार आहे.   

कशी करावी नोंदणी:

 • प्रथम इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.in या संकेतस्थळावर जावे
 • JOB SEEKER (FIND JOB) पर्याय निवडावा 
 • त्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यात आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून साइन इन करावे
 • उमेदवारांनी यापुर्वी रोजगार पोर्टलवर नोंदणी केली नसेल तर नोंदणी कारावी
 • त्यासाठी 'नोंदणी' नावावर क्लिक करावे
 • एक नवीन पेज ओपन होईल त्यात नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख, लिंग, आधार क्रमांक, भरुन नोंदणी करावी
 • त्यानंतर साइन इन करून मुंबई शहर निवडावे.
 • पंडित दीनदयाल उपाध्याय चालू रोजगार मेळावा यावर क्लिक करुन सविस्तर माहिती भरावी
 • 'I Agree' पर्याय निवडावा 
 • शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना विविध कंपन्यांच्या जागा दिसतील त्यावर Apply करावे 
 • त्यानंतर कंपनीकडून दूरध्वनी, भ्रमणध्वनी, इमेल, गुगल, तसेच स्काईपद्वारे ऑनलाईन मुलाखती घेतली जाईल
 • मुलाखतीत पास होणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन नियुक्ती पत्र दिले जाईल.
 • त्यानंतर उमेदवारांनी नोकरीच्या ठिकाणी उपस्थित राहावे.

कोणत्या क्षेत्रात मिळणार रोजगार

सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल केले त्यामुळे उद्योगाची चक्रे पुन्हा गतीमान होऊ लागली, उद्योगांना कामगारांची आवश्यकता भासू लागली. उद्योगाची गरज लक्षात घेऊन कामागार विभागाने राज्यातील बेरोगार तरुणांना रोजगार देण्यासाठी मेळाव्याचे नियोजन केले. त्यात मुंबई शहारतील विविध कंपन्यांनी सहभाग घेतला. सेल्स अॅड सर्विस, अॅटोमेबाईल्स, लोन, डिलिव्हरी, कस्टमर केअर, रिकव्हरी, प्रमोटर, ऑपरेटर, पर्यवेक्षक, टेक्निशियन अशा विविध क्षेत्रात रोजगार मिळणार आहे.    

  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News