आयुका संस्थेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धेचं आयोजन

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 25 February 2020

आंतर विश्वविद्यालय केंद्र खगोलविज्ञान आणि खगोलभौतिक म्हणजेच आयुका संस्थेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंबेगाव तालुक्‍यात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या.

घोडेगाव : आंतर विश्वविद्यालय केंद्र खगोलविज्ञान आणि खगोलभौतिक म्हणजेच आयुका संस्थेमार्फत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आंबेगाव तालुक्‍यात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या. यात विविध शाळांतील २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

विद्यार्थ्यांना पुणे येथील आयुकामध्ये आयुकाचे संचालक सोमक रायचौधुरी यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धा या वर्षी शासकीय तंत्रनिकेतन अवसरी खुर्द याठिकाणी घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विज्ञान प्रश्‍नमंजूषा, निबंध आणि चित्रकला या स्पर्धांचा समावेश करण्यात आला होता. ग्रामीण भागातील विविध शाळांमधून सुमारे २५० विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. आयुकाचे शास्त्रज्ञ सुहृद मोरे, जनसंपर्क अधिकारी समीर धुरडे, वैज्ञानिक सहायक नीलेश पोखरकर आदी उपस्थित होते. २८, २९ फेब्रुवारी २०२० रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन, आयुका, पुणे याठिकाणी साजरा केला जाणार असून तो सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे, अशी माहिती आयुका गिरवली वेधशाळेचे वैज्ञानिक सहायक नीलेश पोखरकर यांनी दिली.

पारितोषिके पटकावलेल्या मुलांची आणि शाळेची यादी पुढीलप्रमाणे. 
प्रश्‍नमंजूषा  : प्रथम क्रमांक - साक्षी आवटे, गुरुराज सराफ, सिद्धांत एरंडे (सर्व न्यू इंग्लिश स्कूल घोडेगाव),द्वितीय क्रमांक - वल्लभ डुकरे, अमान मोमीन, साईश इंदोरे (सर्व न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी),तृतीय क्रमांक - आकांशा कडधेकर, गिरीज बांगर, श्रेयस शिंदे (सर्व नालंदा इंग्लिश मीडियम स्कूल 
मंचर)
चित्रकला  : प्रथम क्रमांक - सिद्धेश दराडे (जगदीशचंद्र महिंद्रा हायस्कूल चिंचोली), द्वितीय क्रमांक - श्रावणी वळसे (पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय निरगुडसर) तृतीय क्रमांक - श्रेयस मुळूक (न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी),
निबंध लेखन : प्रथम क्रमांक - समृद्धी थोरात (विद्या विकास मंदिर अवसरी), द्वितीय क्रमांक - मेहनूर इनामदार (न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडी),  तृतीय क्रमांक - वैष्णवी पुंडे (पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय 
निरगुडसर)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News