औरंगाबादमध्ये तीन दिवसीय 'निरोगी हृदय' शिबीराचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020

हृदयाच्या विकारापासून दूर राहण्यासाठी शुक्रावर (ता. 28) शनिवार (ता. 29) रविवार (ता.1) सलग तीन दिवस 'हॉटेल वर्ष इन' येथे 'निरोगी हृदय' शिबीराचे आयोजित केले.

औरंगाबाद : हृदय रोगामुळे जगातील सर्वांधिक लोकांचा मुत्यू होतो अशी माहिती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO)च्या अहवालानुसार सिद्ध होते. जगात दरवर्षी सरासरी १. ७९ करोड नागरिक हृदयरोगाने मृत्यू पावतात यामध्ये ५ पैकी ४ मृत्य हे हार्ट अटॅकमुळे होतात तर एक त्रितीआंश मृत्यू हे वयाची सत्तरावी गाठण्यापुर्वीच होता. २०२३ पर्यंत जागतिक मृत्यूचा आकडा सरासरी २ करोड पेक्षा वरती जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हृदयाच्या विकारापासून दूर राहण्यासाठी शुक्रावर (ता. 28) शनिवार (ता. 29) रविवार (ता.1) सलग तीन दिवस 'हॉटेल वर्ष इन' येथे 'निरोगी हृदय' शिबीराचे आयोजित केले आहे अशी माहिती ग्लोबल हार्ट फौंडेशनचे डॉ. प्रसाद अरवेनदेकर, प्रसन्न वंजारी आणि डॉ. राहुल देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

निरोगी हृदय शिबिरामध्ये 3D vasculography तंत्रज्ञानाद्वारे शरीरावर १२ इलेक्ट्रोड लावून त्याद्वारे कोणत्याही प्रकारची सुई न टोचता हृदयाची व रक्तवाहिन्यांची सद्य स्थिती जाणून घेता येते. आपल्या हृदयाला कोणत्या प्रकारचा धोका आहे आणि तो कश्या प्रकारे आपण टाळू शकतो हे आपणास या तंत्रज्ञानाद्वारे समजते. २० वर्षे पुण्यामध्ये हृदयरोग विकारांच्या उपचारांमध्ये कमालीची कामगिरी केल्यानंतर ग्लोबल हार्ट फौंडेशन कडून प्रथमच औरंगाबाद मध्ये अशा शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. हृदयरोग होण्यापूर्वीच जनतेने हृदयाची काळजी कशी घ्यावी हे शिबिरामध्ये सांगितले जाणार आहे. मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी व्हावे असे अवाहन देखील सुजल नारायण यांनी केले. 

स्व. डॉ. ए. व्ही. नारायण यांनी नॉन इन्वेन्सिव्ह कार्डियोलॉजीचे क्रांतिकारी तंत्रज्ञान पुण्यात आणले होते. हृदयरोगांवरील पारंपारिक उपचार पद्धतीला अत्यंत्य सुलभ आणि आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर असा हा पर्याय आहे. हृदय विकार होण्यापूर्वीच त्यावर मात कशी करायची याची जनजागृती ग्लोबल हार्ट फाउंडेशन देशभर करत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News