युनिवर्सिटीचे आदेश; लिपस्टिक लावून कॉलेज कँपसमध्ये आल्यास 100 रुपये दंड

यिनबझ टीम
Tuesday, 28 January 2020

pok म्हणजेच पाकिस्तानमधील  काश्मिर भागात असलेल्या एका विद्यापिठाने एक फर्मान काढले आहे, ज्यात असे नमुदे केले आहे की कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कुठल्याही तरुणीने लिपस्टिक लावून येऊ नये, तसे अढळून आल्यास संबंधीत तरुणीला 100 रुपये दंड आकारण्यात येईल.

pok म्हणजेच पाकिस्तानमधील  काश्मिर भागात असलेल्या एका विद्यापिठाने एक फर्मान काढले आहे, ज्यात असे नमुदे केले आहे की कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कुठल्याही तरुणीने लिपस्टिक लावून येऊ नये, तसे अढळून आल्यास संबंधीत तरुणीला 100 रुपये दंड आकारण्यात येईल.

पाकिस्तानच्या काश्मीरमधल्या मुजफ्फराबाद सुनिव्हरसिटीने हा नियम लागू केला आहे. विद्यार्थ्यांना आदेश देत विद्यापिठाच्या अॅडमिनिस्ट्रेशन टीमने ही नोटीस जारी केली आहे. ज्या तरुणी या नियमांचे उल्लंघन करतील, त्या तरुणींना प्रत्येकवेळी 100 रुपये दंड आकारण्यात येईल. युनिव्हरसिटीचा हा आदेश सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. 

या आदेशाचे उल्लंघन केलेली एक विद्यार्थीनी मुसरत काजमी हिला एक नोटीस पाठवण्यात आली आहे. ज्यावर विद्यापिठाच्या कोऑर्डिनेटरची स्वाक्षरीदेखील आहे. 

या नियमांची पाकिस्तानचे पत्रकार नायला इनायत यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनी एक ट्विर करत म्हटले आहे की एखादी मुलगी कॅम्पसमध्ये लिपस्टिक लावून येत असेल तर तिला 100 रुपये दंड आकरणार तर एखादा मुलगा जर कॅम्पसमध्ये लिपस्टिक लावू आला तर त्यालादेखील दंड आकारण्यात येणार आहे का? असा सवाल त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News