मराठमोळ्या तरूणाने बनवले 'शेअर इट'ला ऑप्शनल अॅप

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 14 July 2020

सध्याची स्थिती  पाहता आपल्याला चायनीज प्रॉडक्ट वापरता येतं नसून त्याला पर्याय म्हणून हे बनवण्यात आलं आहे. तसेच या अॅपमध्ये पुढे अजून काही फिचर येण्याची शक्यता आहे. 

मराठमोळ्या तरूणाने बनवले 'शेअर इट'ला ऑप्शनल अॅप

 

भारत-चीन सीमावाद मधील संघर्ष टोकाला गेला आणि त्याचे पडसाद दोन्ही बाजारपेठांवर व्हायला लागले आहेत. २० जवान शहीद झाल्यानंतर भारताने चीनच्या ५९ अॅपवरती बंदी घातली. त्यामध्ये अनेक अॅप भारतीयांच्या रोजच्या वापरातले होते. शेअर इट हे अॅप प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये असायचे, त्यामधून मोबाईल मधील घेवाण-देवाण मोठ्या प्रमाणात केली जात होती. 

 

यवतमाळच्या एका तरूणाने शेअर इट अॅपला ऑप्शनल अॅप तयार केले असून त्या अॅपचे नाव सेंड इट आहे. या तरूणाचे नाव तेजस तायडे असून त्याने मागील चार महिन्यापासून या अॅपवरती काम सुरु केले होते. हे अॅप तयार करण्यासाठी मागील चार महिन्यापासून त्याचे दोन मित्र त्याला मदत करत होते. तयार केलेल्या अॅपचं नाव सेंड इट असून ते शेअर इट सारखचं काम करत असल्याचे तेजस तायडे सांगतो. विशेष म्हणजे हे अॅप सेक्युर असल्यामुळे ह्याचा डाटा चोरीला जाऊ शकत नाही. 
 

सध्याची स्थिती  पाहता आपल्याला चायनीज प्रॉडक्ट वापरता येतं नसून त्याला पर्याय म्हणून हे बनवण्यात आलं आहे. तसेच या अॅपमध्ये पुढे अजून काही फिचर येण्याची शक्यता आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News