पर्यटक म्हणून करिअर करण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 February 2020

महाराष्ट्राला अतिशय प्राचीन आणि सुंदर इतिहास लाभला आहे. हा इतिहास काळाची धूळ झटकून जगासमोर येणे आत्यंतिक गरजेचे आहेच पण ती महाराष्ट्राची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकाधिक मुलांनी राष्ट्रभक्तीच्या उद्देश्याने, महाराष्ट्र राज्याचे पांग फेडण्याच्या विचाराने, आणि जाज्वल्य इतिहास निर्माण केलेल्या युगप्रवर्तक महाराज आणि त्यांच्या निष्टावंत मराठ्यांच्या प्रती कृतज्ञता म्हणून या विषयाकडे गांभीर्याने पहिले पाहिजे.

अनेक ट्रेकर्स आणि इतिहास प्रेमी, शिवभक्त गडकिल्ल्यांवर जाउन शासनाच्या नाकर्तेपणा साठी आणि मराठ्यांच्या इतिहासाप्रती असलेल्या कृतीहीनतेसाठी दोष देतात.त्यापेक्षा इतिहास विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्यटकांचे गाइड होण्याची संधी मिळू शकते. इतिहासाच्या खाचाखोचा अचूक, वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि प्रभावीरीत्या सांगू शकणाऱ्या, विविध ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण करू शकणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात चांगली मागणी मिळू शकते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News