नर्सरी टीचर पदासाठी संधी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 22 February 2020
  • अगदी छोट्या गावापासून मेट्रोपर्यंत पसरलेले इंग्रजी माध्यमाचे वेड आता सार्वजनिक आहे; पण त्याच वेळी याच माध्यमातून परिपूर्ण शिकलेली असंख्य चुणचुणीत मुले-मुली सामान्य मार्कांनी पदवीधर होत आहेत.

अगदी छोट्या गावापासून मेट्रोपर्यंत पसरलेले इंग्रजी माध्यमाचे वेड आता सार्वजनिक आहे; पण त्याच वेळी याच माध्यमातून परिपूर्ण शिकलेली असंख्य चुणचुणीत मुले-मुली सामान्य मार्कांनी पदवीधर होत आहेत. या मुलांचे इंग्रजी हा अत्यंत मोठा प्लस पॉइंट त्यांनी लक्षात घ्यायचा आहे. बीपीओ, कॉल सेंटरवर धडका मारून दार सगळ्यांना उघडत नाही. उघडले, तरी ते आयुष्यभर झेपत नाही, हेही आता अनेकांना कळले आहे. मग अशांना हा सुंदर रस्ता आहे.

वर्षभराचा माँटेसरीचा वा प्रायमरी टीचरचा कोर्स अनेक ठिकाणी आहे. अगदी पदवीदरम्यानसुद्धा तो पूर्ण होऊ शकतो. अन्यथा, पदवीनंतर स्कूल सायकॉलॉजीची पदविका अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. मात्र, यातील प्रगतीचे टप्पे व कौशल्ये नीट लक्षात घ्या. अस्खलित इंग्रजी, सोपे इंग्रजी, गप्पांतून इंग्रजी, इंग्रजी बडबडगीते यावर हातखंडाच हवा.

घरी आई मराठीतून बोलणार, बाबा ऑफिसचे इंग्रजी बोलणार, अशा घरातील मुलांचे इंग्रजी सफाईदार बनवून देणा‍ऱ्या अगदी २६ ते ३६ वर्षे वयोगटातील शिक्षकांना सध्या प्रचंड मागणी आहे. सुरुवात व कायम काम एखाद्या नर्सरी वा केजीत व जोडीला तीन ते चार तास ट्युशन्स यातून मनाजोगती कमाई व आनंद दोन्ही मिळवणारे आज असंख्य आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News