खर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत लघू ग्रंथालयाचा उद्घाटन सोहळा

दिव्येश जाधव (खर्डी)
Thursday, 20 February 2020

राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने सोमवारी (ता१७) दळखण गावातील जिल्हा परिषद प्रशाळा क्र.१ मध्ये लघू ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले.

खर्डी : जीवनदीप शैक्षणिक संस्था संचालित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डीच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने सोमवारी (ता१७) दळखण गावातील जिल्हा परिषद प्रशाळा क्र.१ मध्ये लघू ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी खर्डी एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल खर्डी संस्थेचे अध्यक्ष दिलीप अधिकारी यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी रोज एक तास तरी अवांतर वाचन केले पाहिजे.अग्निपंख, सत्याचे प्रयोग, कथा, कादंबरी अशी विविध विषयांचे वाचन बुद्धीला चालना देणारे ठरते त्यामुळे वाचन करणे महत्वाचे असते. तर संस्थेचे अध्यक्ष यांनी डिजिटल युगात वाचन संस्कृती जोपासली गेली पाहिजे असे मार्गदर्शन केले.

याप्रसंगी जीवनदीप संस्थेचे अध्यक्ष श्री. रविंद्र जी घोडविंदे, दळखण गावचे सरपंच श्री. भगवान मोकाशी, श्री. संजय हारेकर, मुख्याध्यापक श्री. रामदास गायकवाड उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. किशोर पवार यांनी केले, सूत्र संचालन प्रा. प्रियंका पवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अपर्णा जाधव व स्वयंसेवकांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्रशाळा क्रं १ चे सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News