७ व्या औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला सुरूवात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 February 2020

या फेस्टिव्हमुळे मराठवाड्यातील अधिक तरूण एकत्र येऊन चित्रपटांचा आनंद घ्यावा, तसेच चित्रपट क्षेत्रात येणा-या इच्छूक तरूणांनी त्यातून प्रोत्साहन घेऊन करिअर करावे. औरंगाबाद पर्यटन क्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळी पोहचावे. 

मुंबई - जगातील उत्तम चित्रपट दाखवणा-या ७ व्याऔरंगाबाद फिल्म फेस्टिव्हलला आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे सुरूवात झाली आहे. या फिल्म फेस्टिव्हल मध्ये विविध कलाकारांची उपस्थिती राहणार असून, जगभराती ४० फिल्मचे प्रदर्शन होणार आहे. अभिनेते प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक श्रीराम राघवन, दिग्दर्शक अभिषेक शाह, दिग्दर्शक ओम राऊत, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संचालक अशोक राणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित उद्धाटन सोहळा पार पडला 

प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन, ‘हेल्लारो’ या सुवर्णकमळ विजेत्या राष्ट्रीय चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शाह, प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, तान्हाजी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, महोत्सवाचे आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संचालक अशोक राणे आदी मान्यवर उपस्थित

मागील ७ वर्षांपासून चांगले चित्रपट रसिकांपर्यंत पोहचवणा-या या फेस्टिव्हलला मराठवाड्यातील अधिक तरूणांचा प्रतिसाद असतो.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - विभागीय केंद्र औरंगाबाद, महात्मा गांधी मिशन प्रस्तुत, औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने हा फेस्टीव्हल होतं आहे.

फिल्म फेस्टिव्हसचा उद्देश 

या फेस्टिव्हमुळे मराठवाड्यातील अधिक तरूण एकत्र येऊन चित्रपटांचा आनंद घ्यावा, तसेच चित्रपट क्षेत्रात येणा-या इच्छूक तरूणांनी त्यातून प्रोत्साहन घेऊन करिअर करावे. औरंगाबाद पर्यटन क्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळी पोहचावे. 

होणा-या फिल्म फेस्टिव्हमध्ये पाच दिवसात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील ९ भाषांच्या चित्रपटांचा समावेश असून राष्ट्रीय पातळीवरील ५ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.  सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला गोल्डन कैलासा पारितोषिकासह १ लाख रूपये पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच विविध पारितोषिक देऊन सहभागी होणा-यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News