फक्त तूच...

विपुल
Tuesday, 26 February 2019

मावळणाऱ्या लाल सूर्यात
पक्ष्यांच्या थव्यात
उगवणाऱ्या चांदण्यात
फक्त तूच.

सूर्याच्या पहिल्या किरणात
पहाटेच्या दवात
गुलाबी वाऱ्यात
फक्त तूच..

दुपारच्या शांततेत
भिजलेल्या वाटेत
गोंधळलेल्या दिशेत
फक्त तूच..

मावळणाऱ्या लाल सूर्यात
पक्ष्यांच्या थव्यात
उगवणाऱ्या चांदण्यात
फक्त तूच..

रात्रीच्या त्या गाढ झोपेत
पानेरी चंद्रिकेत
जागलेल्या पहाटेत
फक्त तूच..

माझ्या सर्व भावनांत
पाहिलेल्या स्वप्नांत
गायलेल्या गाण्यात
फक्त तूच..

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News