कोरोनाला रोखण्याचा 'हा' एकमेव उपाय

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 18 April 2020
  • अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला 

वॉशिंग्टन ः कोरोनाविरुद्धची प्रतिबंधक लस अद्याप तयार नसल्यामुळे सोशल डिस्टन्सिंग तसेच गर्दी किमान 2022 पर्यंत टाळणे आवश्‍यक आहे, असे सांगतानाच अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी कोरोनाची साथ पुन्हा मोठ्या प्रमाणावर येऊ शकते असा इशारा दिला आहे.

केवळ आता लॉकडाऊन केल्यामुळे कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळवता येणार नाही. नव्याने कोरोनाची साथ आल्यास जास्त गंभीर असेल असेही त्यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक लस तयार न झाल्यास ही साथ पुन्हा येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. कोरोना प्रत्येक हिवाळ्यात येऊ शकतो, हे टाळण्यासाठी सुरक्षित अंतर हाच उपाय आहे. अमेरिकेतील कोरोनाचा प्रभाव आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे.

देशातील काही राज्यांतील सर्व यंत्रणा या महिन्यातच खुली होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सांगत असतानाच हा अहवाल जाहीर झाला आहे. लागण झालेले आणि त्याची लागण वेगाने होण्याचा धोका असलेल्या व्यक्ती असल्यास रोग जास्त वेगाने पसरतो. रोगप्रतिबंधक मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्यास धोका जास्त असतो, असे हॉवर्डमधील साथीच्या रोग्याच्या अभ्यासकांनी म्हटले आहे. त्यांनी शाळा बंद ठेवणे, गर्दीच्या कार्यक्रमास प्रतिबंध, घरातच राहण्याचा आदेश हे अजून काही वर्षे अमलात आणण्याची गरज असल्याचे सांगितले.
 

लोकांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावे यासाठीचे उपाय अमलात आणल्यास त्याचा अर्थव्यवस्था, शैक्षणिक प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होईल. त्यामुळेच कोरोना रोखण्यासाठी हाच एकमेव उपाय असू नये, हे आम्ही जाणतो असेही या अभ्यासकांनी म्हटले आहे. एकदा कोरोनाची लागण झालेल्यांना पुन्हा त्याची लागण होऊ शकते का, याबाबत आताच काहीही सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News