.... तरच फुटबॉल संघांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 20 July 2020

शातील महिला फुटबॉलच्या प्रसारास चालना देण्यासाठी भारतीय फुटबॉल महासंघाने क्‍लब नोंदणीसाठी महिलांच्या संघाचाही आग्रह धरण्याचे ठरवले आहे.

नवी दिल्ली:  देशातील महिला फुटबॉलच्या प्रसारास चालना देण्यासाठी भारतीय फुटबॉल महासंघाने क्‍लब नोंदणीसाठी महिलांच्या संघाचाही आग्रह धरण्याचे ठरवले आहे. सध्या अ आणि ब श्रेणीतील क्‍लबना सूट असली, तरी त्या श्रेणीसाठी भविष्यात महिला संघाची अट असणार आहे.

भारतीय फुटबॉल महासंघ क्‍लबच्या मान्यतेचा निर्णय घेत असते. आम्ही युवा गटासाठी कार्यक्रम अमलात आणतानाही टप्प्याटप्प्याने निर्णय घेतला होता. आता त्याची चांगली फळे मिळत आहेत. महिला फुटबॉलबाबतही हेच घडेल. भारतीय महिला फुटबॉल लीगमधील संघाची संख्या वाढण्यास सुरुवात होईल, असे महासंघाचे सचिव कुशल दास यांनी सांगितले.
भारतात पुढील वर्षी विश्‍वकरंडक 17 वर्षांखालील मुलींची फुटबॉल स्पर्धा होणार आहे. यंदा 2 ते 21 नोव्हेंबरदरम्यान ठरलेली ही स्पर्धा आता 17 फेब्रुवारी ते 7 मार्चदरम्यान होईल. भारतात 2022 मध्ये आशियाई महिला फुटबॉल स्पर्धा होणार आहे. या दोन्ही स्पर्धांमुळे देशातील महिला फुटबॉलला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

भारतीय फुटबॉल महासंघ महिला फुटबॉलच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे, पण त्याचबरोबर क्‍लबचीही यास साथ हवी आहे, असे दास यांनी सांगितले. गतमोसमात महिला फुटबॉल लीगमध्ये 12 संघांचा सहभाग होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News