"निमित्त फक्त रणजितच्या लग्नाचे"

कमलेश जाधव
Sunday, 28 April 2019

आज सकाळी घरातील काम आवरले आणि हलकर्णी ते नागणवाडी असा प्रवास बसने केला. मी बसमधून उतरताच माझ्या समोरून पुणे बस गेली. मग लगेच लागली ती लोकमतची पेपर गाडी. मग काय, प्रत्येक बसथांबा करत गडहिंग्लजला पोचलो आणि बसथांब्यावरच चहा-पोहेचा कार्यक्रम आवरला. बहिरेवाडीमार्गे मला कोल्हापूर बस मिळाली आणि बस बहिरेवाडीला येताच शिक्षणमहर्षी जे.पी.नाईक यांचे सभागृहाचे बसमधुनच दर्शन झाले.

आज सकाळी घरातील काम आवरले आणि हलकर्णी ते नागणवाडी असा प्रवास बसने केला. मी बसमधून उतरताच माझ्या समोरून पुणे बस गेली. मग लगेच लागली ती लोकमतची पेपर गाडी. मग काय, प्रत्येक बसथांबा करत गडहिंग्लजला पोचलो आणि बसथांब्यावरच चहा-पोहेचा कार्यक्रम आवरला. बहिरेवाडीमार्गे मला कोल्हापूर बस मिळाली आणि बस बहिरेवाडीला येताच शिक्षणमहर्षी जे.पी.नाईक यांचे सभागृहाचे बसमधुनच दर्शन झाले.

मी निपाणीमध्ये आलो. जिथे उतरलो तेथे एक ट्रॅक्स लागली होती. मी त्यांना विचारले की, मला यमगेला जायचे आहे, ते पण हळुहळु गाडी चालवत निघाले. असा प्रवास करत एकदाचा मी यमगेला पोचला. निलेशला फोन केला, निलेश बोलला की मी मुरगुडमध्ये आहे तु पुढे चल, मग मी चालत, विचारत, आमचे मित्र रणजित भाट यांचे लग्न कुठे आहे, याची चौकशी करत त्याच्या घरी पोचलो. त्याला मी जवळजवळ सहा वर्षानी बघत होतो. तो आर्मीमध्ये लागला होता. 

आज त्याचे लग्न. खरोखरच कधी कळालेच नाही की, बघताबघता सहावर्षे कशी गेली. तो माझी विचारपुस करत होता .कोण कोण आले आहे काय, माझ्या लग्नाला? मी सांगितले की, निलेश तेवढा येणार आहे. लगेच त्याचा चेहरा पडला आणि मीपण जरा बाहेर थांबतो म्हणून घरातून बाहेर उभा राहीलो. थोड्याच वेळात निलेश आला. आम्ही पुन्हा रणजितची भेट घेतली. मला वाटतं, बरोबर बारा वाजले होते, मी व्हाट्सअॅपचे मॅसेज पाहू लागलो, स्टेटस पाहिले आणि मला समजले की, नागपुरमधील मंगेश दाणी व अजिंक्य शिंदे येत आहेत. मी लगेच निलेशला बोलत होतो की, मंगेश येत आहे. बोलून पाच मिनिटे झाली आणि सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का बसला. बगतो तर काय? नाशिकहून यश जाणवलकर (जाणु), महाडहून सचिन बेल्लुरे (हड्डी), शुभम ढेरे (सातारा) कंवठेवरुन (भाई) सुरज धिंगडे, यवतमाळहून अंजिक्य शिंदे, गडचिरोलीकडून मंगेश दाणी आणि नागपुरमधून निलेशने व मी बघताच त्यांना मिठी मारली. 

कारण जवळजवळ एक वर्षाने भेट झाली होती. फक्त दोन दिवसाचा फरक होता, याच महिण्यात मला सर्वजण यवतमाळमध्ये भेटले होते. लगेच सगळे रणजितला भेटले, त्याच्या चेहऱ्यावर आंनद पसरला होता. तो सर्वांना सात वर्षांनंतर बघत होता. 

लग्नाची विधी आटोपली आणि त्या गर्दीतून बाहेर एका झाडाजवळ आम्ही सर्वजण आलो. सुरजने चालु केले. सध्या काय करत आहेत सर्व, हे सांगा. तो प्रत्येकाचा व्हिडीओ करत होता, सर्वप्रथम अंजिक्य शिंदे व शेवटी मी बोललो. माझे बोलणे ऐकुन जरा सर्वांनी गमंत केली. मला आत्मविश्वास निर्माण केला. मग आम्ही जेवण केले, फोटो काढले, काही वेळ बसलो आणि तेथून त्यांचा निरोप घेतला आणि थेट निलेशच्या घरी गारगोटी येथे पुष्पनगर येथे पोचलो. मला आठवतं की, 2016च्या दसऱ्याला मी निलेशच्या घरी पाहुणचारासाठी आलो  होतो त्यानंतर आता आलो. 

निलेशची आई मन-मिळावू. मी त्यांना भेटलो. मला बोलल्या, बारीक झालास. फोटोत मोठा दिसतोच, मी लगेच नतमस्तक झालो. लगेच आम्हाला कोकम आणून दिला. निलेश स्वतःचे घर दाखवत होता. तेवढयात मी व ढेरे कीकी जवळ जावुन बोलू लागलो. आमचा सर्वाचा लाडका गिटार वाजवणारा, यवतमाळचा ऋत्विक कदम हा निलेशच्या घरी होता. निलेशचा आगदी जवळचा मित्र आणि त्याबद्दल सांगताना काकींना आपले अश्रू आनावर झाले.

वादळ सुटले होते. निलेश बोलला की, आता आपण किल्ले भुदरगडला जावु. मग सगळे लगेच तयार. सुरजचा कॅमेरा होताच आणि सोबत सचिनचा मोबाईल. जाताना पाऊस चालु झाला. मी भिजणार म्हणून गाडीत जावुन बसलो. सुरज व मंगेश एका गाडीवरुन व निलेश व अंजिक्य बुलेटवरुन निघाले. थोड्या आंतरावर गेल्यानंतर पाऊस व गारब्या पडु लागल्या. अनेकजण घरासमोरच्या गारब्या वेचत होते .जस आम्ही गडावर पोचलो तसा पाऊस कमी झाला मग फोटोशुट चालु झाले .मला त्या सर्वाना बगुन आंनद झाला होते. 

गडावर निलेश माहिती सांगत होता. सगळेजण फोटो काढण्यात मग्न होतो. गड फिरला, मीपण पहिल्यांदाच किल्ले भुदरगडला आलो होतो. मग सर्वांना घरी जाण्याचे वेध लागले. पुन्हा गडावरुन खाली येताना कैरी पडल्या होत्या त्या गोळा करुण जेवणासोबत खाण्यासाठी घेऊन आलो. घरी आल्यानंतर चहा घेतला थोडावेळ एकमेकांना फोटो शेअर केले व घरातुन काकीचा व मामिचा निरोप घेतला. निलेशच्या मामाचा मुलगा करणही आमच्यासोबत दिवसभर होता. त्यानेसुद्धा एजॉय केला. त्याचासुद्धा निरोप घेतला व आम्ही निघालो. 

मी व निलेश अजिंक्यच्या गाडीने बसस्टॅड वर आलो. मी बसने आल्याने माझी बस एक तासाने सुटणार होती. पाठोपाठ सर्वजण आले, पुन्हा एकदा भेट झाली आणि सर्वजण आपपल्या गावी निघाले. या सर्वाची पुन्हा कधी भेट होईल, काय सांगता येणार नाही, हसत-हसत सर्ववजण निघाले. पण माझ्या डोळ्यात जरा पाणी आले. निमित्त होत लग्नाचे,  पण  दोन वर्षे ज्याच्या सोबत काढली, ते मित्र पुन्हा भेटतील, का आसा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर निर्माण झाला. कारण प्रत्येकजण आपपल्या कामात असणार. 

खरोखरच सर्वाना भेटुन, बघुन भरपूर आंनद झाला. ते जाणूचे शब्द तुझ्यासाठीच आलोय रे. पुन्हा भेटु आसे सांगुन निरोप घेतला व पोचल्यावर फोन करतो असे म्हणणारे आपल्या आयुष्यात मित्र कमीच आसतात. धन्यवाद सर्वाना मला भेटल्याबददल पुन्हा कधीतरी योग आलाच तर आणि कोल्हापूरला येण्याचे नियोजन झाले तर नक्की फोन करा रे... मग मला सात वाजता गारगोटी ते गडहिग्लंज बस मिळाली आणि हा लेख लिहीत मी साडेआठ वाजता गडहिग्लंजमध्ये पोचलो आणि तेव्हापासुन ते रात्री साडेदहापर्यंत बसच नव्हती...

 चंदगडला जाणारे जे प्रवासी होते, ते अक्षरशः कंटाळून गेले होते. जो-तो वाहतुक निंयत्रकला विचारत होता, कधी येणार बस म्हणून... पण ते म्हणत होते, बस नक्की येणार म्हणून... घरातून फोनवर फोन येऊ लागले. लहान भाऊ सारखे फोन करत... मी म्हणत होतो, बस आली की, नक्की फोन करतो... म्हणून त्यात मित्राचा सारखा फोन. सुरज व यश निलेश सारखेच फोन करत होते. बस मिळाली का म्हणून... मग काय, शेवटी मुंबई पारगड इसापुर बस आली. तोपर्यंत मला एका प्रवासी मित्राची ओळख झाली. ते माझ्या बाजूच्या सिटवर बसले होते. 

माझी विचारपुस करत होते, कुठे जाणार, किती वाजता पोहचणार म्हणून, जेवण केला काय म्हणून विचारले, मी नाही आता घरी जाऊन जेवण करेन म्हणालो. त्यांनी क्षणाचाही विंलबा न लावता त्याच्या पिशवीतून एक चक्की पाकीट काढले आणि बाळा तु हे खा म्हणून माझ्या हातात टेकवले. ते गृहस्त नेसरीमध्ये उतरले. त्यांना एक समाधान वाटत होत की, एका उपाशी आसणाऱ्या प्रवाशाला आपण फूल ना फुलाची पाकळी दिली म्हणून... खरोखरच धन्यवाद काका... तुम्ही चक्की दिलात आणि माझी भुकच हरवली. एक परका माणूस आपल्यासाठी एवढं करतो,. म्हणजे मानुसकी अजून शिल्लक आहे, असे वाटतं.  

नागणवाडीमध्ये बस रात्री साडेअकरा वाजता आली. त्यावेळी लहान भाऊ व त्याचा मित्र मला बाईकवरुन नेण्यासाठी आले होते. नागणवाडी ते हलकर्णी आम्ही पंधरा मिनिटांत आलो. रात्रीचे पावणे बारा वाजले होते, जेवण केले व झोपी गेलो... माझ्या एकट्यासाठी रात्री बारा वाजेपर्यंत सर्वाची झोप मोड झाली होती, तरीही आजचा दिवस आम्हा-सर्वांना मोलाची भेट देऊन गेला, हे नक्की.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News