परिक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा - उध्दव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 August 2020

वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे. विद्यार्थी पास झाले तर कोरोनाच्या काळात त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला मदत घेता येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

परिक्षांबाबत देशपातळीवर एकच निर्णय घ्यावा - उध्दव ठाकरे

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमात आहेत. कारण अद्याप सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा होणार की नाही स्पष्ट केलेले नाही. पण नॉन प्रोफेशनल कोर्सेसच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा घेऊ नयेत अशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. कोरोनाचा कार्यकाळ हा कोणालाही  माहित नाही. त्याचबरोबर देश पातळीवर एकच निर्णय लवकरात लवकर घेण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे  महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, पंजाब आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. हा संवाद राज्यातील उपाययोजनांबाबत होता. त्यावेळी अंतिम परीक्षेच्या पेचाविषया उध्दव ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी चर्चा केली.

वैद्यकीय शिक्षणाच्या परीक्षाबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता असून मौखिक स्वरूपात परीक्षा घेण्याची गरज आहे. विद्यार्थी पास झाले तर कोरोनाच्या काळात त्यांच्या इच्छेनुसार आपल्याला मदत घेता येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News