18 हजार 380 फूट पर्वतावर सायकलस्वारी करणारी महाराष्ट्राची ही एकमेव हिरकणी

प्रसाद जोशी
Wednesday, 31 July 2019
  • वसईच्या हर्षालीची मनाली पर्वतावर सायकलस्वारी

वसई: केनिया सीमेजवळ असणाऱ्या सर्वाधिक उंचीचे किलिमांजरो शिखर पार करणारी सह्याद्री रांगेतील हिरकणी, वसईची सुकन्या हर्षाली वर्तक हिने मनाली खरादूंग लेह अशा सायकल मोहिमेत भारताचे प्रतिनिधित्व केले. यावेळी तिने 10 दिवसांत 5360 मीटर प्रवास केला. यात ती एकमेव मुलगी होती. युथ हॉस्टेल ऑफ असोशिएशन (YHAI) ने सायकल मोहिमेचे आयोजन केले होते.

या सायकल मोहिमेत भारतातून एकूण 92 सायकलपट्टूनी सहभाग घेतला होता. गिर्यारोहक हर्षाली हिने रोमांचक प्रवास करत सह्याद्री रांगेतील लोहगड, हरिचंद्रगड, कळसुबाई, नाणेघाट, राजगड, तोरणा, कलावंतीण असे अनेक हिमालयातील अनेक पर्वत शिखरे जिद्दीने गाठणारी हिने माउंट किलिमांजरो हे केनिया देशाच्या सीमेजवळ असणारे शिखर सुद्धा सर केला आहे. उंचच उंच पर्वतरांगा चढतांना अनेक अनुभव गाठीशी बांधत जिद्दीने तिने प्रवास केला आहे व सह्याद्री- हिमालयातील मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. एन. आय. ऐम (Nim)या संस्थेकडून माऊंटनियरिंगची पदवी "अ" श्रेणीमध्ये पूर्ण केली आहे.महाराष्ट्रात देखील सर्व कानाकोपऱ्यात गिर्यारोहण केले आहे.

त्यातच आता तिला सायकलवरून मनाली खारदुगला ते लेह सायकल मोहिमेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली व ती सोडता तिने आयोजकांना होकार दिला. 18 हजार 380 फूट शिखरावर जातांना खडतर प्रवास अनुभवयाला मिळाला मात्र त्यात आनंद मिळाला. सकारात्मक विचार मला हे शिखर चढण्यास कामी आला असे हर्षाली वर्तक हिने सकाळशी बोलतांना सांगितले. 

सुरुवातीला 92 जण एकत्र सायकलने निघाले व लेह येथे पोहचले नंतर 77 जणांनी खरादूंगपर्यंत प्रवास केला यातून फक्त 18 हजार 380  फूट शिखरावर 17  जणच पोहचले यात फक्त एकमेव मुलगी म्हणून हर्षाली होती जिने जिद्दीने शिखर गाठले. तिच्या या साहसाचे वसई तालुक्यातून कौतुक होत आहे.

भारतातील सायकलपट्टू सहभागी झाले होते. त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला आयोजकांनी दिली याचा अभिमान वाटत आहे.शिखरावरील मार्गात अनेक अडथळे होते.परंतु ते पार करत गेली.मुलींमध्ये मी एकटीच होती.सायकल व चालणे यामुळे आपण सुदृढ राहतो. प्रत्येकाने थोड़ा वेळ काढून व्यायाम केला पाहिजे.
- हर्षाली वर्तक, गिर्यारोहक, वसई

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News