पंतप्रधानांनच्या  हस्ते उदघाटन केलेल्या असीम रोजगार पोर्टलवरून केवळ ७७०० बेरोजगारांना मिळाले काम

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020
  • कोरोना महामारी काळात बेरोजगार झालेल्या लोकांना रोजगार मिळावा याकरीता पंतप्रधान मोदींच्या हस्ते असीम म्हणजेच "आत्मनिर्भर स्किल एम्प्लॉयी एम्प्लॉयर मॅपिंग" या रोजगार वेब पोर्टलचे उदघाटन करण्यात आले होते.
  • ह्या रोजगार वेबपोर्टलचे उदघाटन झाल्यापासून ४० दिवसात सुमारे ६९ लाख लोकांनी यावर आपली नोंदणी केली आहे.

नवी दिल्ली :- कोरोना महामारी काळात बेरोजगार झालेल्या लोकांना रोजगार मिळावा याकरीता पंतप्रधान मोदींच्या हस्ते असीम म्हणजेच "आत्मनिर्भर स्किल एम्प्लॉयी एम्प्लॉयर मॅपिंग" या रोजगार वेब पोर्टलचे उदघाटन करण्यात आले होते. ह्या रोजगार वेबपोर्टलचे उदघाटन झाल्यापासून ४० दिवसात सुमारे ६९ लाख लोकांनी यावर आपली नोंदणी केली आहे. कौशल्य विकास मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार १४ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट यादरम्यान जवळजवळ ७ लाखांहून अधिक लोकांनी यापोर्टलवर आपली नोंदणी केली. परंतु रोजगाराकरीता नाव नोंदवलेल्यानंपैकी केवळ ७७०० बेरोजगारांनाच आतापर्यंत रोजगार मिळू शकला आहे.

असीम रोजगार पोर्टलवर देशातील ५१४ कंपन्यांनी नोंदणी केली असून त्यातील ४४३ कंपन्यांनी १.४९ लाख नोकऱ्यांची माहिती या ठिकाणी दिली आहे. यापैकी लॉजिस्टिक, आरोग्य, बँकिंग,वित्तियसेवा, इन्शुरन्स या क्षेत्रातील नोकऱ्यांचा वाटा ७३.४ टक्के इतका आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असीम रोजगार पोर्टलवरून १.४९लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या होत्या मात्र ७,७०० लोकांनीच दिलेल्या रोजगार संधीचा स्वीकार केला. अंगी विविध कौशल्य असलेल्या लोकांच्या हाताला कोरोना महामारीच्या संकटात काही काळापुरते काम मिळावे याकरीता असीम रोजगार वेबपोर्टल सुरु करण्यात आले होते. असीम पोर्टलवरून रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी स्थलांतरित मजुरांन समवेत शिंपी, इलेकट्रिशन, तंत्रज्ञ अशा अनेक मंडळींनी नोंदणी केली होती. परंतु देशात सध्या नर्स,स्वच्छता कामगार,अकाऊंट एक्सझीकेटीव्ह , सेल्स  एक्सझीकेटीव्ह, कुरियर डिलिव्हरी या जागांकरीता उमेदवारांचा शोध सुरु आहे.

कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांचे रोजगार संपुष्टात आल्यामुळे मजुरांनी आपल्या राज्यात परत जाण्याची वाट धरली. त्यामुळे कौशल्य विकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील कर्नाटक, दिल्ली, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू याराज्यात मजुरांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा जाणवू लागला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News