कोरोना काळात बेरोजगारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळावे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 July 2020

 देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे जवळपास तीन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. ह्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत.

मुंबई :  देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यामुळे जवळपास तीन महिने लॉकडाऊन करण्यात आले होते. ह्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे, व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत.  राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेत ऑनलाईन रोजगार मेळावे या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

पुणे, नाशिक,सातारा, सांगली, औरंगाबाद, नागपूर, ठाणे, यवतमाळ, उस्मानाबाद  या जिल्हांमध्ये ह्या उपक्रमाला सुरवात झाली असून २५ हजार तरुणांनी यामध्ये सहभाग नोंदवला. तसेच राज्यात सध्या कोरोनाचे संकट असल्याने ऑनलाईन रोजगार मेळावे भरवण्याकरता राज्य सरकार तर्फे www.mahaswayam.govt.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. राज्यसरकारच्या तरुणांसाठीच्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ११५ कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून या कंपन्यांमध्ये १२ हजारहून अधिक जागा आहेत. 

पुणे, ठाणे, सांगली, सातारा, औरंगाबाद, नागपूर  येथे आतापर्यंत प्रत्येकी एक रोजगार मेळावा घेतला गेला असून या मेळाव्यात १२११ उमेदवारांची निवड झाली आहे, तसेच उर्वरितांची निवड प्रक्रिया सुरु आहे. नाशिक, यवतमाळ येथील कार्यालयांनी प्रत्येकी २ तर उस्मानाबाद येथील मॉडेल करियर सेंटर यांनी ४ मेळावे घेतले असून महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये ही अशाप्रकारचे ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News