एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह कोर्सेस

डाॅ पी बी माने
Saturday, 17 October 2020

आॅनलाईन लर्निंग प्लॅटफाॅर्म्सचा वापर करून अवकाश तंत्रज्ञान आणि त्याचा प्रत्यक्षातील उपयोग याच्याशी संबंधित युजर सेग्मेंट आणि अॅकॅडमिया या दोन्ही घटकांना बळकटी देण्यासाठी आयआयआरएसचे आउटरिच प्रोग्रॅम केंद्रीत असतात. हे प्रोग्रॅम इंटरनेटवर विनाशुल्क उपलब्ध असतात. त्या अनुषंगाने संस्थेमध्ये इंटरअॅक्टीव्ह आॅनलाईन कोर्सेसचे आयोजन करण्यात आले आहे. 

एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजीतर्फे आॅनलाईन इंटरअॅक्टीव्ह कोर्सेस

पुणेः एआयएसएसएमएसच्या इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजी ही संस्था आता भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) नेटवर्क इन्स्टिट्यूटचा एक भाग बनली आहे. त्यामुळे डेहराडून इस्रो आणि इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ रिमोट सेन्सिंग (आयआयआरएस) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या आॅनलाईन कोर्सेसचे नोडल सेंटर म्हणून एआयएसएसएमएसचे इन्स्टिट्यूट आॅफ इन्फर्मेशन टेक्नोलाॅजी ओळखले जात आहे.

आॅनलाईन लर्निंग प्लॅटफाॅर्म्सचा वापर करून अवकाश तंत्रज्ञान आणि त्याचा प्रत्यक्षातील उपयोग याच्याशी संबंधित युजर सेग्मेंट आणि अॅकॅडमिया या दोन्ही घटकांना बळकटी देण्यासाठी आयआयआरएसचे आउटरिच प्रोग्रॅम केंद्रीत असतात. हे प्रोग्रॅम इंटरनेटवर विनाशुल्क उपलब्ध असतात. त्या अनुषंगाने संस्थेमध्ये इंटरअॅक्टीव्ह आॅनलाईन कोर्सेसचे आयोजन करण्यात आले आहे. 

कोर्सचा तपशील

कोर्सचे नावः ६९-आयआयआरएस आउटरीच प्रोग्रॅम आॅन आरएस अँड जीआयएस अॅप्लिकेशन्स

कधी सुरू होणार - २६ आॅक्टोबर २०२०

कोर्सचे नावः ७२-आयआयआरएस आउटरीच प्रोग्रॅम आॅन बेसिक्स आॅफ जिओकाॅम्प्युटेशन अँड जिओवेब सर्व्हिसेस 

कधी सुरू होणारः १९ आॅक्टोबर २०२०

इच्छुक विद्यार्थ्यांनी पुढील लिंकवर क्लिक करावे https://elearning.iirs.gov.in/edusatregistration/student

अधिक माहितीसाठी प्रोग्रॅम समन्वयक शोभा निकम यांच्याशी ९८६०७०९६८७ या क्रमांकावर किंवा shobha.nikam@aissmsioit.org या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News