महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमतर्फे 'यूपीएससीतील' गुणवंतांचा ऑनलाईन सत्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020

महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्यावतीने केंद्रीय लोकसेवा आयोग 'युपीएससीच्या' परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील काही निवडक अधिकार्‍यांचा प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाईन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून इन्कम टॅक्सच्या आयुक्त तथा सध्या महाराष्ट्र एड्स नियंत्रण समितीत संचालक असलेल्या पल्लवी दराडे  यांची प्रमुख उपस्थिती होती.

अलीकडे प्रशासनात जातीयवाद, धर्मांधता, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला असून यामध्ये  दलित- वंचित,उपेक्षित समाज भरडला जात आहे, त्यासाठी नव्याने प्रशासनात येणाऱ्या अधिकाऱ्यांनी संविधानाला सुसंगत असे काम करावे व शोषित, वंचित, उपेक्षित यांच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहान महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे संस्थापक अध्यक्ष इ.झेड. खोब्रागडे यांनी केले.

महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमच्यावतीने केंद्रीय लोकसेवा आयोग 'युपीएससीच्या' परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील काही निवडक अधिकार्‍यांचा प्रातिनिधिक स्वरूपात ऑनलाईन सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून इन्कम टॅक्सच्या आयुक्त तथा सध्या महाराष्ट्र एड्स नियंत्रण समितीत संचालक असलेल्या पल्लवी दराडे  यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना खोब्रागडे म्हणाले, सिविल सर्विसमध्ये प्रवेश केलेल्या अधिकाऱ्यांकडून समाजाच्या खूप अपेक्षा असतात. त्यांनी समाजहित डोळ्यासमोर ठेवून काम करणे अभिप्रेत आहे. या परीक्षेत ग्रामीण भागातले व ज्यांना ओळख नसलेल्या, ज्यांच्याकडे कुठलाही चेहरा नसलेल्या अशा अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवलेले आहे, ही भूषणावह बाब आहे. त्यांनी प्रशासनामध्ये आल्यावर 'नाही रे' वर्गासाठी काम करण्याची गरज आहे. प्रशासकीय चौकटीत काम करताना व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रसंगी सिस्टीममध्ये काही बदल करूनही काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पल्लवी दराडे यांनी सनदी अधिकारी म्हणून किंवा प्रशासकीय सेवेत काम करीत असताना फार मोठं क्षेत्र असते. कुठल्याही क्षेत्रात आपण गेलात तर तिथे आपण एक प्रमुख म्हणून काम करत असतो, त्यामुळे आपले काम पद, पैसा, प्रतिष्ठा यापेक्षा आपण उत्कृष्ट काम करून आपले नाव टिकवले पाहिजे. आपण लोकांसाठी काम करण्यासाठी या सेवेत आलो आहोत, याची सदैव जाणीव ठेवून प्रशासकीय माध्यमातून जास्तीत जास्त समाजसेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षणामध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळतात, त्यामुळे प्रशिक्षणाकडे गांभीर्याने पाहावे, आपले काम हे संविधानानुसार  व्हावे हेच  उद्दिष्ट असते, मात्र हे काम करताना अनेक चॅलेंजेस असतात. ते स्वीकारून संविधानाला अभिप्रेत काम करावे, असेही त्या म्हणाल्या. आपण किती चांगलं काम केलं, समाजासाठी किती काम करण्यात यशस्वी झालो, याकडे लोक लक्ष ठेवून असतात,त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये सरकारी सेवेत अधिकाधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करावा, असा सल्लाही दराडे यांनी दिला.

प्रारंभी महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे सचिव शिवदास वासे यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फोरमचे सहसचिव डॉ. बबन जोगदंड यांनी केले.यावेळी इ.झेड. खोब्रागडे, पल्लवी दराडे व सदानंद कोचे या सनदी अधिकाऱ्यांनी यशस्वी झालेल्या अंकिता वाकेकर, अजिंक्य विद्यागर, हेमंत नंदनवार,  अझरुद्दीन काझी, अशीत कांबळे, सुमित रामटेके, निखिल दुबे, निलेश गायकवाड,सौरभ हटकर, योगेश पाटील,संग्राम शिंदे अभिजीत सरकटे यांचा शब्दसुमनांनी सत्कार करून त्यांना पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्काराला उत्तर देताना यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करून जीवनात हार न मानता स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, असा संदेश दिला. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेला लवकर सुरुवात केली तर लवकर यश मिळू शकते, असेही  या अधिकाऱ्यांनी सांगितले. व्यवस्थित अभ्यासक्रम समजून घेऊन मागील प्रश्नांचे विश्लेषण करून परीक्षेत अपयश आले तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत, असे आवाहनही यातील अधिकाऱ्यांनी केले. याप्रसंगी अजिंक्य विद्यागर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची माझ्या जीवनात प्रेरणा असल्यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो, असे भावोद्गार  काढले.

यातील सर्व यशस्वीतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बबन जोगदंड यांनी केले तर आभार फोरमचे उपाध्यक्ष डॉ. विजयकुमार माहुरे यांनी मानले. या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी संजय खडसे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोक गेडाम, प्रा. महेंद्रकुमार मेश्राम,विलास सुटे, रमेश जंजाळ, क्रांती खोब्रागडे, यशवंत भंडारे, बाबूराव पाईकराव, सुवर्णा पवार, डॉ. प्रशांत गजभारे, धर्मेश पुसाटे,  चंद्रशेखर खोब्रागडे, यशवंत मानखेडकर, दुबईतून सुषमा जगतकर, इंडोनेशियातून नेहा खोब्रागडे व जम्मू कश्मीर मधून धम्मदीप सोनकांबळे यांच्यासह जवळपास दोनशे जणांची उपस्थिती होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News