पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान शाखेंतर्गत डिपार्टमेंट आॅफ टेक्नोलाॅजीतर्फे घेण्यात येणाऱ्या इनोव्हेशन अँड न्यू व्हेन्चर या विषयातील पदव्युत्तर पदवी डिप्लोमा कोर्ससाठी आॅनलाईन प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ४ सप्टेंबरपासून या परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्यात येत असून २० सप्टेंबरपर्यंत त्याची मुदत आहे.
हा कोर्स २१ आठवड्यांच्या कालावधीचा असून त्यासाठी ३० जागा उपलब्ध आहेत. कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेतील पदवी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी प्रवेश घेता येईल, असे विद्यापीठाचे उपकुलसचिव उत्तम चव्हाण यांनी नमुद केले आहे.
जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत तेदेखील या प्रवेश परीक्षेसाठी पात्र असतील, मात्र पदवी शिक्षणात उत्तीर्ण झाल्यासच त्यांना अंतिम प्रवेश देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारच्या नियम व निकषांनुसार प्रवेश निश्चित केले जातील. प्रवेश परीक्षेसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांना पाचशे रुपये तर आरक्षित गटातील विद्यार्थ्यांना साडेतीनशे रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे शुल्क डेबिट किंवा क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिगमार्फत आॅनलाईन पद्धतीने करण्याची सुचना विद्यापीठाने केली आहे.
महत्त्वाच्या तारखा
- आॅनलाईन अॅप्लिकेशन भरण्यासाठी सुरवात – ४ सप्टेंबर
- आॅनलाईन अॅप्लिकेशन भरण्यासाठी शेवटची दिनांक – २० सप्टेंबर
प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम हा डिपार्टमेंट आॅफ टेक्नोलाॅजीच्या वेबपेजवर प्रसिद्ध केला जाणार आहे
अर्ज भरताना हे लक्षात ठेवा
- आॅनलाईन अॅप्लिकेशन फाॅर्म https://campus.unipune.ac.in/ccep/login.aspx या लिंकवर उपलब्ध आहे
- पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिकेची प्रत अपलोड करावी
- शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मागील सत्राची गुणपत्रिका अपलोड करावी
- आरक्षित गटातील विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र, नाॅन-क्रिमीलेयर (असल्यास) अपलोड करावे
- शारीरिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाकडून मिळालेले वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करावे
अटी व शर्ती
- एकदा अर्ज भरल्यानंतर त्यातील माहिती बदलण्याची सोय देण्यात आलेली नाही
कोणत्याही प्रमाणपत्राची छापील प्रत देण्याची आवश्यकता नाही
- गुणवत्ता यादीत आलेल्या प्रत्येकाला प्रवेश मिळेलच असे नाही
अंतिम प्रवेशावेळी विभागातर्फे सांगण्यात आल्यानंतर मूळ प्रती सादर कराव्या
- प्रवेश मिळाल्यानंतर प्रत्येकासाठी वसतीगृहाची व्यवस्था असेलच असे नाही