दिव्यांग विद्यार्थ्यांनाही आता ऑनलाइन शिक्षण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 August 2020

प्रत्येक विद्यार्थ्यांला घरी शिक्षण देण्यात येणार असल्याचे पतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर व्हाट्सअप्प, झुम मिटिंग, गुगल मीट, आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग अशा पध्दतीने सुध्दा शिक्षण देण्यात येणार आहे. घरी शिकवणीसाठी गेल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असंही नमूद करण्यात आले आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांनाही आता ऑनलाइन शिक्षण

महाराष्ट्र - कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना चांगलं ऑनलाइन शिक्षण मिळावं, यासाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल, लॅपटॉप किंवा इंटरनेट अभावी शिक्षणात खंड पडला आहे. परंतु इतर ठिकाणी शिक्षण सुरू आहे. पण दिव्यांग विद्यार्थ्यांचे सुध्दा शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी दिव्यांग मुलांना सु्ध्दा ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार असल्याचं निर्णय राज्य सरकारने घेतला. तशी माहिती आज राज्य सरकारने हायकोर्टात दिली.

दिव्यांग विद्यार्थी ऑनलाइन पध्दतीने शिक्षण घेऊ शकत नसल्याने त्यांना इतर पध्दतीने शिकविणे गरजेचे आहे. पण सुरूवातीपासूनचं अशा विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न होताना दिसले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. याबाबत अनामप्रेम संस्थेच्यावतीने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाची नियमावली राज्य सरकारने तयार केली आहे. पण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने आत्तापर्यंत कसलाही निर्णय घेतलेला नाही. असा दावा अॅड. उदय वारुंजीकर यांनी याचिकेत केला आहे. या संदर्भात आज सामाजिक न्याय विभागाकडून पतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

असं होणार शिक्षण सुरू

प्रत्येक विद्यार्थ्यांला घरी शिक्षण देण्यात येणार असल्याचे पतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्याचबरोबर व्हाट्सअप्प, झुम मिटिंग, गुगल मीट, आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग अशा पध्दतीने सुध्दा शिक्षण देण्यात येणार आहे. घरी शिकवणीसाठी गेल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी योग्य ती काळजी घ्यावी असंही नमूद करण्यात आले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News