तरुणींमध्ये वनपीसचा बोलबाला...

सुस्मिता वडतिले 
Thursday, 25 July 2019

सोलापूर: युवतींसाठी बाजारात कितीही नवनवीन फॅशन उपलब्ध झाली तरी पार्टीवेयर, लग्नसमारंभ, मोठेमोठ्या कार्यक्रमात सध्या क्रेझ आहे, ती वनपीसची. पण नेहमीप्रमाणे फक्त पायघोळ वनपीसच नव्हे तर इतर प्रकारांनाही यंदा विशेष मागणी आहे. 

सोलापूर: युवतींसाठी बाजारात कितीही नवनवीन फॅशन उपलब्ध झाली तरी पार्टीवेयर, लग्नसमारंभ, मोठेमोठ्या कार्यक्रमात सध्या क्रेझ आहे, ती वनपीसची. पण नेहमीप्रमाणे फक्त पायघोळ वनपीसच नव्हे तर इतर प्रकारांनाही यंदा विशेष मागणी आहे. 

विविध स्टाईलचे, घेरदार, गडद रंग, सुंदर एम्ब्रोईडरी आणि कुंदन वर्क केलेल्या वनपीस यांची बाजाराच्या दुकानात रांगच्या रांग लागलेली दिसून येते. कोणत्याही दुकानात गेला तरी पटकन हेच ड्रेसेस समोर येतात. तरूणी यंदा यासोबत निरनिराळी कॉम्बिनेशन वनपीसला मागणी करीत आहेत. त्यामध्ये लाईट कलर आणि उठावदार डिझाईन्सना सध्या खूप क्रेझ दिसून येतीय. 

वनपीसला जोडून असलेले अनेक प्रकार सध्या भरपूर बाजारात मिळत आहेत. त्यावर बारीक एम्ब्रॉयडरी असते, त्यामुळे त्याचा लूक आणखी उठून दिसतो, आणि वनपीसमध्ये आणखीन भर पडली आहे ती स्लीट वनपीसची. सध्या त्याची फॅशन डिझायनर, एम्ब्रोईडरी वापरले जातात. सिल्क नेट मटेरियलमध्ये हे वनपीस दाखल झाले आहेत. शॉर्ट वनपीससोबतच गुडघ्यांपर्यंत लांबी वनपीसही यंदा हिट आहेत यामुळे युवतींचा कल नवनवीन प्रकारच्या वनपीसकडे आकर्षित झाला आहे. कॉटन, शिफॉन कपड्यांच्या प्रकारामुळे ड्रेसेस खूप छान दिसतात यावरील हटके एम्ब्रोईडरी, चंदेरी काठ, फ्लोअर प्रिंट्‌समुळे त्याला आणखीन शोभा आली आहे. 

सध्या मार्केटमध्ये वनपीसचे नवनवीन प्रकार उपलब्ध झाले असून त्यांच्या किंमती एक हजार रुपयांपासून ते पाचहजार रुपयांपर्यंत आहे. प्रत्येक तरुणी आपल्या पसंतीनुसार वनपीस खरेदी करीत आहे, त्यामुळे बाजारात वनपीसला भरपूर मागणी आहे. 
- पवन कोरे, विक्रेता 

वनपीसचा ट्रेंड हा युवतींमध्ये भिनला आहे. कॉंलेजसाठी, पार्टीवेयर, कार्यक्रमात हल्ली वनपीसच दिसून येत आहेत. म्हणून प्रत्येक युवती वनपीस आवर्जुन खरेदी करीत आहे. दिवसेंदिवस वनपीसचे प्रकारातील क्रेझ तरूणीमधील वाढत चालली आहे. 
- अनन्या आडम, ग्राहक

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News