एक मत असे तिचे...

स्नेहल पवार
Monday, 15 July 2019

लहानपणी आई बाबा
नेहमी म्हणायचे
अनोळखी व्यक्तिपासून
नेहमी दूर  राहायचे

लहानपणी आई बाबा
नेहमी म्हणायचे
अनोळखी व्यक्तिपासून
नेहमी दूर  राहायचे

लहानपणच्या आनंद
सरत गेला
मोठेपणी डोक्यावर दबावांचा
भार आला

शिक्षण सरताच घरच्यांना
लग्नाची घाई व्हायला लागली
चहा पोह्याचा कार्यक्रमाची सवय
मला करून घ्यावी लागली

प्रत्येक वेळी शोभेच्या 
बाहुलीप्रमाणे पुढे जायचं
मोठ्यांचा मान राखत त्यांचं
आदरातिर्थ करायचं

कसाबसा तो क्षण तासभराचा
असायचा,अनोळखी व्यक्ती
पाहण्यासाठी तो क्षण खरंच
 पुरेसा नसायचा

त्या भेटीनंतर ते अनोळखीच
असायचे
मग होकार नकराचे उत्तर मी 
त्यांना कसे काय द्यायचे

मनाची समजूत घालत
एक अनपेक्षित होकार द्यायचा
आणि त्या अनोळखी व्यक्ती बरोबर
संसराचा गाढा चालवायचा

हे सर्व करताना कधी कश्याचा
अर्थच नाही लागला
प्रेम करण्याचा विषय तर 
खूप दूर राहून गेला

म्हणून संसरासाठी नुसती
दोन व्यक्तींची गरज नसावी
लग्नाआधी त्या दोन मनाची
एक गोड प्रेमकहाणी असावी

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News