वेदनेची वाट तुडवत निघालेला वाटसरू

सागर विजय घोडेराव
Friday, 11 September 2020

नगरच्या बसस्थानकावर त्याचे पाकीट, बॅग व मोबाइल चोरांनी पळवले, अक्षरशः भीक मागून तो येवला पर्यंत आला. तो हात देत असताना रस्त्याने जाणारे कोणतेही वाहन थांबत नव्हते, जीवाचे रान करत तो रडत माझ्या पाया पडू लागला. मला एखाद्या गाडीत बसून द्या अशी विनंती करू लागला.

आज येवला तालुक्यात कामानिमित्त गेलो असता सावरगाव येथे राहत्या घरी जात असताना नगर कडून येणारा एक अदृश्य भेटला. त्याला मालेगांव जायचे होते चौकशी केल्यावर समजले हा गुजरातचा कामानिमित्त कर्जत (नगर) येथे राहतो. तो अनवाणी पायाने प्रवास करत होता, त्याचे पाय जळत होते, शेजारी असलेल्या एका ओळखीच्या हॉटेलमधून त्याला चप्पल दिली. भुकेला व्याकुळ झालेला दिसत होता, त्याला नास्ता दिला. आजच्या या कोरोना काळात त्याची जी परिस्तिथी झाली होती ती फार बिकट झाली होती. 

नगरच्या बसस्थानकावर त्याचे पाकीट, बॅग व मोबाइल चोरांनी पळवले, अक्षरशः भीक मागून तो येवला पर्यंत आला. तो हात देत असताना रस्त्याने जाणारे कोणतेही वाहन थांबत नव्हते, जीवाचे रान करत तो रडत माझ्या पाया पडू लागला. मला एखाद्या गाडीत बसून द्या अशी विनंती करू लागला. त्यांच्या खिशात फक्त 30 रुपये होते. लोक माझ्याकडे बगत होते मी त्याला 100 रुपये देऊन मालेगाव गाडीत बसून दिले.

मालेगावला त्याचा एक मित्र राहतो त्याला गुजरातला नेण्यासाठी मदत करेल हीच अपेक्षा आहे. खरं म्हणजे अडलेल्या नडलेल्या माणसाला मदत करणे आपले परम कर्तव्य आहे ते मी त्याप्रमाणेच आमची सकाळ यिनची टीम करत आलो आणि यापुढेही करत जाणार. आपला महाराष्ट्र हा साधुसंतांचा पुरोगामी चळवळीचा वारसा साजणारा आहे. ही शिकवण आपण नेहमी आचरणात आणत प्रामाणिकपणा अंगी बाळगायला हवा. 
(लेखक सकाळ यिन महामंडळाचे नाशिक जिल्हा अध्यक्ष आहेत)
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News