स्थानिक बोलीभाषा टिकविण्यासाठी प्रयत्न

सकाळ वृत्तसंस्था (यिनबझ)
Thursday, 7 March 2019

जगभरातील सुमारे ६७०० स्थानिक भाषांपैकी ४० टक्के भाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असा निष्कर्ष जागतिक पातळीवरील समितीने संयुक्त राष्ट्रसंघासमोर मांडला. त्यामुळे २०१६ मध्ये राष्ट्रसंघाने २०१९ हे आंतरराष्ट्रीय स्थानिक भाषा वर्ष जाहीर केले. या अनुषंगाने ‘बोलू बोलीचे बोल’ हा अनोखा उपक्रम बाईट्‌स ऑफ इंडियाने राबवला.

रत्नागिरी : यामध्ये महाराष्ट्रातील मालवणी, वऱ्हाडी, आगरी, कोकणी, तावडी, सातारी, दालदी या विविध भाषांतील कविता, कथा, संवादाचे साहित्यिकांचे व्हिडिओ केले आहेत. त्या भागातली संस्कृती, खाद्यसंस्कृती, परंपरा, कला, इतिहास आणि त्या भागाशी संबंधित ज्ञानाचा कित्येक वर्षांचा ठेवा त्या भाषेत सामावलेला असतो.

त्यामुळे स्थानिक भाषा जपण्याच्या दृष्टीने जागरूकता निर्माण करण्याकरीता हा उपक्रम राबवला आहे. दर १२ कोसांवर भाषा बदलते, असे दिसते. त्यामुळे या प्रत्येक बोलीत काही वेगळे शब्द आहेत. प्रत्येक बोलीचा लहेजा, सौंदर्यस्थळे, रांगडेपणा, भावना थेट व्यक्त करण्याची क्षमता या गोष्टी भुरळ घालणाऱ्या आहेत. या भाषांच्या संवर्धनासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. दालदी मुस्लिम कोकणी बोलीवर डॉ. प्रा. निधी पटवर्धन यांनी अभ्यास केला असून या बोलीच्या जतनासाठी त्या कार्यरत आहेत.

सहभागी साहित्यिक व बोलीचे नाव
कमलाकर देसले- अहिराणी, मधु पांढरे- तावडी, सर्वेश तारे- आगरी, फेलिक्‍स डिसुझा- सामवेदी, डॉ. निधी पटवर्धन- दालदी मुस्लिम कोकणी बोली, संगमेश्‍वर कोकणचा साज, संगमेश्‍वरी बाज लोकनाट्य, राजेंद्र बर्वे कोकणी आणि चित्पावनी, प्रा. व. बा. बोधे- सातारी, डॉ. अरविंद कुंभार- सोलापुरी, अक्षय वाटवे- घाटी बोली, प्रसाद कुमठेकर- उदगिरी, ऐश्‍वर्या डावरे- मराठवाडी, विजयालक्ष्मी देवगोजी- बेळगावी, डॉ. विठ्ठल वाघ- वऱ्हाडी, नीता चिकारे- वैदर्भीय, डॉ. सुमिता कोंडबत्तुनवार- झाडी बोली व गोंडी बोली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News