एक महिना ‘नो सोशल मीडिया’

यिनबझ ऑनलाईन टीम
Wednesday, 13 February 2019

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहेत. पण आता सई काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहणार आहे.

   ती म्हणते, ‘ट्‌विटर, इंस्टाग्राम, फेसबुकवर मी नेहमीच सक्रिय असते. सोशल मीडियातून माझ्या चाहत्यांशी संवाद साधायलाही आवडतं. पण काही काळ मला स्वतःसाठी वेळ हवा आहे. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी मी हे करणार आहे.

’सईचे इन्स्टाग्रामवर नऊ लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत; तर ट्विटरवर ७९ हजारांपेक्षा जास्त लोक तिला फॉलो करतात. आता एक महिना तरी ती या सगळ्या गोष्टींपासून दूर राहणार आहे. एक महिन्यानंतर सई तिच्या चाहत्यांसाठी काही नवं सरप्राईज घेऊन येणार का? हे पाहायचंय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News