वडिलांचे पार्थिव अंगणात असताना धीराने दिलेल्या पेपरमध्ये शंभरपैकी शंभर गुण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020

बाबांना मला डॉक्टर करायचं होतं, मी ते त्यांचं स्वप्न पुर्ण करणार...आज असते तर गावभर आनंदात सांगत फिरले असते - सानिका पवार 

वडिलांचे पार्थिव अंगणात असताना धीराने दिलेल्या पेपरमध्ये शंभरपैकी शंभर गुण

यवतमाळ - ज्या दिवशी दहावीचा पेपर त्या दिवशी वडिलांनी आत्महत्या केली, आत्महत्येचं कारण म्हणजे सततची नापिकी...घरातलं अवसान गळून पडावं अशी परिस्थिती, अंगणात बाबाचं पार्थिव..अशा परिस्थितीत धीराने जाऊन दिलेल्या पेपरमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळविल्याने परिसरात सानिका पवारचं कौतुक केलं जात आहे. त्याबरोबर दहावीच्या परिक्षेत सानिकाने ९७.६० टक्के मार्क मिळविले आहेत. 

यवतमाळ तालुक्यातील हिरवी येथील सानिका पवार ही शेतकरी कुटुंबातील मुलगी अत्यंत हुशार त्याचबरोबर धाडसी सुध्दा. सहा मार्चचा दिवस उजाडला परंतु तो दिवस आयुष्यातला इतका वाईट असेल असा सानिकाने विचार सुध्दा केला नसेल. ६ मार्चला संस्कृतचा पेपर होता, अभ्यासाची तयारी झाल्याने सानिका निवांत होती. त्याचवेळी बाबांनी आत्महत्या केल्याची माहिती सानिकाला झाली आणि तिने हंबरडा फोडला. 

तिच्या वडिलांचं नाव सुधाकर पवार शेती करीत होते. सततच्या नापिकीला कंठाळलेले, त्यातचं अंगावर कर्जाचं डोंगर असल्याने मनानेही खचले होते. सतत दडपणाखाली असल्याने त्यांनी विहीरीत उडी घेऊन आपलं आयुष्य संपवलं. 

आपलं भविष्य ठरविणीरी परीक्षा सुरू असताना, अंगा खांद्यावर खेळवणा-या बापाने आत्महत्या केल्याने सानिका खचून गेली होती. बापासाठी अंगणात तिरडी बांधत असताना पाहून 'सहनही होईना आणि बोलही येईना' अशी सानिकाची परिस्थिती झाली. त्याच दिवशी सानिकाला संस्कृतचा पेपर होता. घरात हे सगळं सुरू असताना सानिकाने धीराने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आईच्या पदराला तोंड पुसलं आणि परीक्षेला लागणारं साहित्य घेऊन सानिका परीक्षा केंद्राच्या दिशेने निघून गेली. तीन ते चार सानिकाने पाठी वळून पाहिले नाहीचं नाही. 

नुकत्याचं जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सानिकाला संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. इंग्रजीत 91, मराठीत 96. या यशाने हिवरी गावाच्या शिरावर मानाचा तुरा खोवला आहे.

बाबांना मला डॉक्टर करायचं होतं, मी ते त्यांचं स्वप्न पुर्ण करणार...आज असते तर गावभर आनंदात सांगत फिरले असते - सानिका पवार 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News