'तारक मेहता का उलटा चष्मा' सिंगापूरमध्ये

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Friday, 8 March 2019

निर्माते असित मोदी यांची ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका घरोघरी पोहोचलेली आहे, या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना स्टारडम मिळाले आहे. गोरेगाव-कांदिवली आदी ठिकाणी या मालिकेचे भव्य सेट्‌स उभारले आहेत. मात्र आता या मालिकेची संपूर्ण टीम परदेशात चित्रीकरणासाठी गेली आहे.

खरे तर एखाद्या मालिकेचे शूटिंग परदेशात होणे ही काही नवीन गोष्ट नाही. यापूर्वी काही मालिका परदेशात गेल्या आहेत आणि छोट्या पडद्यावर परदेशातील नयनरम्य अशी स्थळे दिसली आहेत.

आता ‘तारक मेहता...’ची टीम चक्क सिंगापूरला गेली आहे. आता या मालिकेत सिंगापूर दिसणार आहे. असित मोदींच्या मते, आम्ही बऱ्याच पर्यटकांकडून सिंगापूरचे गोडवे ऐकलेले आहेत. बहुतेक जण सिंगापूरला पसंती देतात म्हणून आम्ही परदेशात चित्रीकरण करायचे तर सिंगापूरला करायचे असे ठरविले आणि सिंगापूरला आलो आहोत.   
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News