पूर्वी लग्नासाठी मुलगी पाहताना नवऱ्यामुलांच्या वयापेक्षा लहान बघितली जात होती. पण आता काळ बदला आहे, कारण आता मुल प्रेमात मुलीला तिच वय विचारत नाहीत. कारण प्रेमात वयाची मर्यादा नसते. प्रेम कोणावरही आणि कधीही होऊ शकते. त्यामुळे मुले प्रेमात पडण्यापूर्वी मुलीचे वय पाहत नाहीत तर ते फक्त तिचा स्वभाव आणि मन पाहतात. जर या दोन्ही गोष्टी मुलींमध्ये असतील तर मग मुल वयाचा विचार करत नाहीत.
सध्याच्या युगात लग्नासाठी वयाची कुठलीच मर्यादा राहिलेली नाही. आपल्याकडे अशी अनेक उदाहरण आहे की, ज्यांनी आपल्या वयापेक्षा जास्त वय असलेल्या मुली सोबत लग्न केले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे प्रियंका चोप्रा आणि निक जोनस याची जोडी. ही जोडी सर्वत्र प्रसिध्द आहे आणि सतत चर्चेत राहणारी जोडी आहे.
होय, बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत तिच्या अभिनयाची छाप तिने सोडली आहे. प्रियंका चोप्राने निक तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असल्याचे म्हटले होते. निकनेही प्रियांकाबरोबर आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठी वयाची मुलगी निवडताना निक म्हणाला की प्रियांकामध्ये आपल्या आयुष्यातील जोडीदारात असलेले सर्व गुण आहेत. तर चला हे जाणून घ्या की मुलांना स्वत: हून मोठ्या मुली का आवडतात?
प्रियंका चोप्राने तिच्या अभिनयाची छाप बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत पाडली आहे. प्रियंका चोप्राचा पती निक जोनस हा तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असल्याचे खुद्द प्रियंका चोप्राने सांगितले होते. निकला सुध्दा तिच्या वयाची अडचण नसल्यामुळे त्यांने सुध्दा प्रियांकासोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला. निकने त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या वयाच्या मुलीची निवड करताना सांगितले की, आयुष्यातील जोडीदार म्हणून मला हवे असलेले सर्व गुण प्रियांकामध्ये आहेत.
मुलांना स्वत: हून मोठ्या मुली का आवडतात?
बुध्दिमत्ता
आपल्या जोडीदारापेक्षा अधिक बोध्दिक क्षमता असल्याने मुलांना आपल्यापेक्षा जास्त वय असलेल्या मुली आवडतात. या कारणामुळेच वयापेक्षा मोठ्या असलेल्या मुलींकडे मुल आकर्षित होत असतात. मोठ्या असलेल्या मुली त्यांच्या जोडीदाराला अधिक उत्तम प्रकारे समजून घेण्यास सक्षम असतात, म्हणून आताची मुले त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या मुलीला डेटवर घेऊन जाण्यास प्राधान्य देतात.
आत्मविश्वास
मोठ्या मुलींमध्ये आत्मविश्वास खूप असतो, कारण त्या मुली स्वत:ला इतरांपेक्षा चांगल समजतात, त्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता नसते. याकारणामुळे मुलांना त्यांच्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या मुली आवडतात.
नात्याबद्दल गंभीरता
मोठ्या मुलींना प्रत्येक नात्याबद्दल आपुलकी असते. त्यामुलींमध्ये समंजसपणा असतो त्यामुळे त्या प्रत्येक नात प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे संभाळतात. या कारणामुळे मुलांना त्यांच्या वयापेक्षा मोठ्या मुली आवडतात. प्रत्येक मुलांला वाटत असते की, लग्नानंतर आपल्या जोडीदाराने सगळ्या नातेवाईकांशी आपुलकीने रहावे. एवढेच नाही तर वयाने मोठ्या असलेल्या मुली आपल्या जोडीदारस नेहमी आनंदी ठेवतात. या सर्व कारणामुळे मुले आपल्यापेक्षा मोठ्या मुलीची निवड करतात.
भावनिक
मुलांना त्याच्या वयापेक्षा मोठ्या मुली आवडतात कारण की, त्या भावनिकदृष्टया खूप कणखर असतात. वयाने मोठ्या असलेल्या मुली लहान-लहान गोष्टीवरून भावनिक होत नाहीत आणि लहान-लहान गोष्टीवरून वाद घालत नाहीत. वयाने मोठ्या असलेल्या मुली समजूतदार असतात. स्वत: निक जोनस एका मुलाखतीत म्हणाला होता की, मला प्रियंकाच्या सौंदर्यात रस नाही आहे तर प्रियंकामध्ये असलेल्या या सर्व कारणांमुळे त्याला प्रियंका आवडते. याचबरोबर प्रियंकापेक्षाही सुंदर असलेल्या मुलींना मी डेट केल आहे असे निक जोनस याने सांगितल आहे.