जुनी शिक्षण पद्धतीच बरी !

सिद्धी नाचरे
Tuesday, 14 January 2020
  • अहो शिक्षण, शिक्षण म्हणजे काय? तहानलेला पाणी, भुकेलेला अन्न आणि आशिक्षिताला साक्षर बनवण्यासाठी मदत करते ते शिक्षण.
  • काळानुरुप आताच्या युगातील बदललेली शिक्षण पद्धती ही पूर्वीच्या शिक्षणासाठी कोस-कोस बर केलेली पायपीट, उशिरा पोहचल्यानंतर गुरुजींकडून होणारी शिक्षा यापेक्षा कितीतरी पटीने वेगळी आहे.

अहो शिक्षण, शिक्षण म्हणजे काय? तहानलेला पाणी, भुकेलेला अन्न आणि आशिक्षिताला साक्षर बनवण्यासाठी मदत करते ते शिक्षण. काळानुरुप आताच्या युगातील बदललेली शिक्षण पद्धती ही पूर्वीच्या शिक्षणासाठी कोस-कोस बर केलेली पायपीट, उशिरा पोहचल्यानंतर गुरुजींकडून होणारी शिक्षा यापेक्षा कितीतरी पटीने वेगळी आहे. आताच्या शिक्षण पद्धतीची तुलना पारंपरिक शिक्षण पद्धती सोबत केली तर पूर्वीच्या वेळी शिक्षक विद्यार्थ्यांना पाढे पाठांतर, कविता पाठांतर अशी शिक्षा देत असे पण आता आधुनिकतेच्या नावाखाली होणारा बदल पाहता शिक्षण थेट पालकांना शाळेत बोलवतात,त्यांना समज देतात परंतु पालक त्याला गांभीर्याने सुद्धा घेत नाही हे दिसून येते परिणामी पहिले पाढे पंचावन्न अशी गत होते. पूर्वी शिक्षण म्हणजे योग्य तो पाठ समजून उमजून लक्षात घेणे परंतु आता स्मार्ट वर्क च्या नावाखाली मुले मूळ संकल्पना संपूर्ण नाहीश्या करतात. आपल्या वर्गातील मित्र- मैत्रिणीच्या अभ्यासात पुढे जाण्यासाठी शिकवण्या, ज्यादाचे वर्ग लावतात. 

हल्लीची शिक्षण पद्धती ही बाजारू झाली आहे. प्रकल्पाच्या नावाखाली खूप पैसे खर्च करावे लागतात. या सर्व गोष्टीमुळेच अलीकडेच शिक्षणाचे पावित्र्य हे कमी झालेले आढळून येत आहे. शिक्षणाचा दर्जा पहिल्या सारखा उंचवायचा असेल तर विद्यार्थ्यांना शिक्षा होणे गरजेचे आहे, पालकांच्या पालक सभा या दर महिन्यातून एकदा होणे गरजेचे आहे, जे विद्यार्थी अभ्यासात इतक्या कुशलतेने भाग घेत नाहीत त्यांचे इतर छंद कोणते आहेत ते लक्षात घेऊन त्यावर शिक्षकांनी व पालकांनी लक्ष देणे बंधनकारक करणे महत्त्वाचे आहे. डिजिटल शिक्षण पद्धती असावी पण त्याचा अतिरेक नसावा. प्रत्यक्षात मुलांना प्रात्यक्षिक करायला सांगणे, योग्य दिशा व मार्गदर्शन मिळावे याकरता शाळेत प्रेरणादायी शिबिरे आयोजित करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

विद्यार्थ्यांना योग्य दिशा देऊन फक्त भागत नाही तर त्याकडे जाताना व्यवस्थित पायऱ्या विद्यार्थी पार पाडत आहेत कि नाही याची चाचणी पालकांनी व शिक्षकांनी करणे अत्यावश्यक आहे तरच प्रगती होईल लेखाच्या सुरवातीला एवढंच म्हणेल कि "नवं ते हवं पण लक्षात असू द्या जुनं ते सोन."

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News