Video Viral : हवालदाराने थेट शक्तीमानकडेच मागितला NRC पुरावा

यिनबझ टीम
Saturday, 18 January 2020

CAA, NRC जेव्हा शक्तीमान दोन बँक लूटारूंना पकडतो, तेव्हा त्याठिकाणी एक पोलीस हवालदार येतो आणि त्या चोरांना सोडून शक्तीमानला त्याच्या भारतीय नागरिकतेबद्दल विचारत असतो, त्यामुळे शक्तीमानही मोठ्याप्रमाणात बुचकाळ्यात पडतो. 

गेल्या एक महिन्यांपासून सीएए आणि एनआरसी यांना घेऊन देशातील अनेक विद्यापीठांपासून मोठ्या शहरांमध्ये आंदोलने होत आहेत, अशा आंदोलनामध्ये काही मजेशीर फ्लेक्सदेखील व्हायरल होत आहेत, तर काही व्हिडीओदेखील व्हायरल केले जात आहेत, अशातच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो म्हणजे काही दिवसांपूर्वी सुप्रसिध्द असलेल्या शक्तीमानचा.

या व्हिडीओ क्लिपमध्ये असे दिसून येते की, शक्तीमानवर आपल्या सिटिजनशिपचा पुरावा देण्याची वेळ येते. सोशल मीडियावर अनेक युजर्संनी हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात शेअर केला आहे. सोबतच अनेकांनी काही मजेशीर प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत.

या व्हिडीओमध्ये शक्तीमान दोन बँक लूटारूंना पकडतो. त्यांच्याकडून चोरीचा माल ताब्यात घेतो, तितक्यात एक पोलिस हवालदार तिथे येतो. तो पोलीस हवालदार त्या चोरांकडे असलेले पिस्तूल परत घेतो, सोबतच त्यांच्याकडे असेलली चोरीची बॅग त्यांना परत करतो आणि त्यांना जाण्यास सांगतो. त्याच्यातच पोलीस हवालदार शक्तीमानला विचारतो की पोलिसांचं काम करण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं, त्यावर शक्तीमान त्याला म्हणतो की देशाच्या मालमत्तेचं रक्षण करणे हे त्या देशातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, त्यावर पोलिस हवालदार शक्तीमानला विचारतो की तु देशाचा नागरिक असल्याचा काय पुरावा आहे?

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News