शिव ठाकरेच्या जुन्या आठवणी !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 4 January 2020
  • मला ढिंगचॅंग कपडे फार आवडतात. एका ठिकाणी कपडे आवडले नाही, तर दुसऱ्या ठिकाणी जातो.
  • बाइकवर फिरायला जायला, आम्हाला खूप आवडतं.
  • कारण, आभाळ भरून येणं वा रिमझिम पावसात भिजणं मला खूप आवडतं.
  • संडे माझ्यासाठी ‘चीट डे’ असतो. त्यामुळे खाण्यावर बंधन लादून घेत नाही. 
  • पुण्यात आल्यानंतर आम्ही ट्रेकिंग वा कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतो.

खरं तर दर वीकएण्डला मला कुठे ना कुठे भटकायला आवडतं. मात्र, मी माझ्या कलाकार मित्रांसमवेत न जाता, इंजिनिअरिंगच्या मित्रांबरोबर फिरतो. सध्या मी मुंबईत राहतो अन् माझे मित्र पुण्यात जॉब करतात. त्यामुळे मी पुण्यात गेल्यावर त्यांच्याबरोबर प्लॅन करतो. कारण, ते मला बिग बॉस विजेता वा रोडिजवाला शिव मानत नाहीत. त्यांच्यासाठी मी मित्रच असतो.

विशेष म्हणजे ते मला जमिनीवरच ठेवतात. कारण, त्यांना मस्तीखोर शिवच हवा असतो. फिरायला गेल्यावर आम्ही हॉटेलऐवजी धाब्यावर जेवतो. हे सर्व करताना आम्ही अनेक जुन्या आठवणींना उजाळा देतो. फिरायला न गेल्यास आम्ही शॉपिंगला जातो. मॉलमध्ये गेल्यावर दोन-तीन ड्रेस हमखास घेतो. माझ्याबरोबर शॉपिंगला येतो, तो खूप कंटाळतो.

कारण, मी कपड्यांबाबत खूप चुजी आहे, मला जे आवडतात तेच कपडे खरेदी करतो. हिवाळा किंवा पावसाळ्यातही विकएंडला मला भरपूर भटकायला आवडतं. या दिवसांत मी काम कमी करतो. ज्या वेळी मित्रांसमवेत फिरायला निघतो, तोपर्यंत कुठं जायचं हे ठरलेलं नसतं. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आमचे प्लॅन ठरतात. अमरावतीत असलो तर चिखलदऱ्याला हमखास जातो.

विदर्भात रोडगे खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळं आम्ही नदीच्या काठाजवळील शेती निवडतो. तिथं एखाद्या शेतकऱ्याला भेटून खाण्याचा प्लॅन करतो. काहींना मटण-चिकण आवडतं तर काहींना वांग्यांची रस्सावाली भाजी आवडते. तिथं गाणी लावून आम्ही खूप मजा करतो. कॉलेजला शिकत असताना असा प्लॅन आम्ही दर आठवड्याला करत होतो.

आता तीन-चार महिन्यांतून एकदाच असा प्लॅन होतो. वीकएंडला घरी बसणं मला आवडत नाही. त्यात एखाद्या मूव्हीला जाऊन तेथे तीन तास बसणं अजिबातच आवडत नाही. मुंबईत शूटिंग नसल्यास आम्ही मरिन ड्राइव्ह, ताज हॉटेल अन बडे मियॉं आदी ठिकाणी जातो. आइस्क्रीम, गुलाबजाम भरपूर खातो. टेन्शन अजिबात घेत नाही.

मात्र, सोमवारपासून डाएट न चुकता पाळतो. ज्या वेळी सार्वजनिक सुटी असते, त्या दिवशी मी अनाथाश्रमात जातो. तेथील मुलांना काही ना काही घेऊन जातो, त्यांच्याबरोबर खूप मस्ती करतो. त्यातून मलाही आनंद मिळतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News