'नवीन' वर्षात जुन्या काळातील 'फॅशन' ट्रेंड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 1 January 2020

नवीन वर्षात जुन्या जमान्यातील फॅशन पुन्हा येणार आहे. अर्थात, ती नव्या ढंगात असणार आहे. त्याला तरुणाईकडून खूप चांगला प्रतिसाद मिळेल.

नव्या वर्षात फॅशन बदल करण्याच्या मूडमध्ये असाल, तर अपडेट तर राहावंच लागतं राव! हे ग्लॅमर मिळवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी झक्कास आयडिया घेऊन येतोय. प्रत्येक बुधवारी असेल फॅशनमधील बदलत्या ट्रेन्डचा ‘जल्लोष.’ आपण फॅशनचा विचार करतो, तेव्हा आपसूकच डोळ्यांसमोर उभे राहतात क्‍लोदिंग, ॲक्‍सेसरीज, फूटवेअर, मेकअप आणि बॉडी प्रपोशन. 

२०१९ मधील फॅशन 

लेडीज : क्रॉप टॉप ॲण्ड हाय वेस्ट डेनिम, क्‍यूलॉट पॅन्ट, प्रिंटेड क्‍यूलॉट, शॉर्ट टॉप आणि फ्लेअर सर्क्‍ट, थ्री फोर्थ लेंथचे वन पीस, केप्ट स्टाइल जॅकेट, टोन डेनिम जीन्स, व्हाईट स्निकर्स. लॉँग कुर्त्याबरोबर पलाझो, सिगारेट पॅन्टसह लाँग जॅकेट कुर्ता, ‘ए’ सिमिट्रिकल कुर्ता, कफ्तान. 
जेन्टस्‌ : चिनोज, कॉटन पॅन्टस, टी-शर्टस, पूलओवर जॅकेट्‌स, बिग चेक्‍स फॉर्मल शर्ट, ‘ए’ सिमेट्रिकल कुर्ता विथ स्ट्रेट फिट ट्राऊझर.
पुन्हा येतेय जुनीच फॅशन
 अमिताभची ‘अमर अकबर ॲन्थनी’मधील बेलबॉटम 
 हेलन स्टाइल शिमरच्या वनपिसची क्रेज
 ग्रॅण्ड मदर क्रोशे ड्रेस, टॉप, जॅकेट, हॉट पॅन्ट, थ्री फॉर्थ, लेअर ड्रेसेस आणि मॅक्‍सी स्कर्ट, 

१९६०मधील मोठ्या प्रिन्टसमधील साडी,

‘बॉबी’चा पोल्का डॉट ड्रेस, 
इमोजी प्रिंटेड साड्या पुरुषांच्या कपड्यांमध्ये प्रिंटेड शर्टस्‌, क्‍यूबन कॉलर किंवा टेनिस कॉलरमधील टी-शर्ट, पॅच वर्क प्रिंट शर्ट.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News