अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसला "अण्णाभाऊ साठे विद्यानगरी' नाव द्या! मुख्यमंत्रीकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 31 July 2020
  • साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीची सांगता शनिवारी 1 ऑगस्ट होत आहे. या दिनाचे औचित्य साधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसचे नाव “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी” असे करावे, अशी मागणी आंबेडकरी लोक संग्रामने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई :- साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीची सांगता शनिवारी 1 ऑगस्ट होत आहे. या दिनाचे औचित्य साधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसचे नाव “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विद्यानगरी” असे करावे, अशी मागणी आंबेडकरी लोक संग्रामने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मनोरंजनातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन हे सूत्र आपल्या वाणीच्या आणि लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत रुजवणाऱ्या अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा आवाज बुलंद केला होता.

जात व्यवस्थेचे चटके त्यांच्या कैक पिढ्यांनी अनुभवले. झोपडपट्टीतले किड्यामुंग्यांचे जगणे पाठीवर घेऊन गुदमरलेला श्‍वास कसा मुक्त करता येईल, यासाठी अण्णाभाऊंनी अखेरपर्यंत आपली लेखणी झिजवली. त्यांच्या “फकिरा” या एकाच कादंबरीने साहित्यविश्‍वाला अक्षरशः जिंकले आहे. जगभरात अण्णाभाऊंचा जन्म शताब्दी सोहळा साजरा होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने त्यांचा गौरव म्हणून मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसचे नाव अण्णाभाऊ साठे विद्यानगरी करा, अशी मागणी आंबेडकरी लोक संग्राम संघटनेचे प्रा. डॉ. जो. के. डोंगरगावकर, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ आणि अच्युत भोईटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News