लठ्ठपणा "या" आजारांना निमंत्रण देतो

सकाळ वृत्तसेवा( यिनबझ)
Monday, 5 August 2019
  • लठ्ठपणा आणि घोरण्याचा आजार लठ्ठ व्यक्तींच्या यकृतात मोठ्या प्रमाणात चरबी जमा झालेली असते. त्यातून यकृताचा आकार वाढलेला असतो. चरबीमुळे पोटही खूप मोठे झालेले असते, हे आपल्याला सहज दिसते.

लठ्ठपणाबरोबर अजूनही काही आजार येतात. या आजारांचे मूळ लठ्ठपणात आहे, हे बहुतांश लोकांना माहीत नसते. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, दम लागणे असे आजार होतात, असे समजले जाते. या बाबत लोकांमध्ये आता जागृतीही होत आहे. पण, काही आजार हे फक्त खूप लठ्ठपणामुळे होतात हे रुग्णांना आणि क्‍लिनिशयनला लवकर समजत नाहीत.

ॲसिडिटी हा आजार त्यापैकीच एक आहे. तसेच स्त्रियांमध्ये लघवी नियंत्रित न होणे हे असे यातील काही आजार आहेत. अतिलठ्ठपणामुळे पोटात फॅटचे प्रमाण होते. त्यातून पोटातील दाब वाढतो. हा दाब अन्ननलिका आणि मूत्राच्या पिशवीवर पडतो. त्यामुळे मूत्राची पिशवी खाली ढकलली जाते. त्याचा थेट परिणाम म्हणून वारंवार लघवीला जावे लागते. 

चौरस आहार, नियमित व्यायाम करूनही चार-पाच वर्षे हा त्रास सहन करणे हा स्त्रियांसाठी खूप त्रासदायक प्रकार असतो. त्याच्या परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर होतो. अशा अतिलठ्ठ स्त्रियांवर केलेल्या बॅरियाट्रिक सर्जरीतून हा त्रास अवघ्या काही दिवसांमध्ये पूर्णतः बरा होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. असे आजार हे लठ्ठपणाशी संबंधित असतात, याची माहिती नसते. डोकेदुखी आणि मायग्रेन मागे आजारही पोटातील चरबीचे दाब हेदेखील अतिलठ्ठ रुग्णांमध्ये एक कारण असते. त्यामुळे रुग्ण यावर वर्षानुवर्षे औषधे घेऊन अतिलठ्ठ रुग्णांमध्ये हा आजार बरा होत नाही. पण, बॅरियाट्रिक शस्त्रक्रियेनंतर हा आजार बरा होण्याची शक्‍यता असते.

लठ्ठपणा आणि घोरण्याचा आजार लठ्ठ व्यक्तींच्या यकृतात मोठ्या प्रमाणात चरबी जमा झालेली असते. त्यातून यकृताचा आकार वाढलेला असतो. चरबीमुळे पोटही खूप मोठे झालेले असते, हे आपल्याला सहज दिसते. त्याचबरोबर श्‍वासनलिकेच्या आजूबाजूला असलेल्या मान, गळा येथेही चरबी साठलेली असते. या सर्वांचा थेट परिणाम श्‍वासनलिकेचा आकार बारीक होण्यावर होतो. आपल्याला झोप लागल्यानंतर शरीरातील सर्व स्नायूदेखील विश्रांती घेत असतात. ते शिथिल झालेले असतात.

त्या वेळी या चरबीचा दाब श्‍वासनलिकेवर पडतो. त्यामुळे फुप्फुसातून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्‍साइड पूर्णतः बाहेर टाकणे अशक्‍य होते. हा कार्बन डायऑक्‍साइड फुप्फुसात जमा होऊ लागतो. त्यालाच ‘स्लीप ॲपनिया’ म्हणतात. हा आजार असणाऱ्या रुग्णाची झोप व्यवस्थित होत नाही. कारण आपल्या मेंदूला ऑक्‍सिजनची मोठी गरज असते, पण शरीरात पुरेसा ऑक्‍सिजन घेतला जात नाही. अशा वेळी कार्बन डायऑक्‍साइड शरीराच्या बाहेर काढण्याच्या वारंवार सूचना मेंदू फुप्फुसांना देत असतो. त्यामुळे रुग्णाला झोपेत सारखी जाग येते.

फुप्फुसे जोरात आकुंचन पावतात, तेव्हा स्वरयंत्र उघडले जाते. त्यातून वेगाने हवा बाहेर टाकली जाते, त्याला घोरण्याचा आवाज म्हणतात. घोरणे हा आजार आहे, हेच आपल्यापैकी बहुतांश जणांना माहिती नसते. रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, हृदयविकार अशी त्याची भविष्यातील गुंतागुंत असते. कार्बन डायऑक्‍साइड वाढल्याने याचा मनावरही परिणाम होतो. अशा रुग्णांना पटकन निर्णय घेता येत नाहीत. त्यांना सर्व लोक आळशी म्हणतात. कारण, ते सारखे झोपत असतात. अतिलठ्ठ व्यक्तींनी बेरियाट्रिक सर्जरी केल्यास यांसारखे आजार पूर्णतः बरे होण्याची शक्‍यता असते, असे वेगवेगळ्या नियतकालिकांमधील शोधनिबंधातून सिद्ध झाले आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News