हृदयाचा व्यायामसाठी 'हे' आवश्यक

डॉ. राजीव शारंगपाणी, क्रीडावैद्दक तज्ज्ञ
Monday, 15 April 2019

हृदयाला व्यायाम होण्यासाठी त्याचे ठोके वाढावे लागतात. अर्थात, नुसते हृदयाचे ठोके वाढणे म्हणजे व्यायाम नाही. अन्यथा, हिचकॉचचा एखादा भयानक चित्रपट पाहताना हृदय भीतीने धडधडले

हेल्थ वर्क :-

आपल्या शरीराच्या स्नायूंना नियमित व्यायामाची गरज असते. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यालादेखील सातत्यपूर्ण व्यायाम लागतो. यात महत्त्वाची गोष्ट अशी, की हृदयाला व्यायाम होण्यासाठी त्याचे ठोके वाढावे लागतात. अर्थात, नुसते हृदयाचे ठोके वाढणे म्हणजे व्यायाम नाही. अन्यथा, हिचकॉचचा एखादा भयानक चित्रपट पाहताना हृदय भीतीने धडधडले, म्हणजे हृदयाला व्यायाम झाला, असे समज वाढीस लागतील. स्नायूंच्या हालचालींमुळे स्नायूंना प्राणवायूची अधिक गरज भासते. ती गरज भागविण्यासाठी अधिक रक्तपुरवठा लागतो. हा अधिक रक्तपुरवठा हृदयाचे ठोके वाढल्यावरच होऊ शकतो. हे वाढलेले ठोके १० ते ३० मिनिटांपर्यंत किंवा जास्त वेळ पडत राहिल्यास हृदयाला व्यायाम होतो. 

साहजिकच हृदयाला व्यवस्थित व्यायाम होण्यासाठी शरीरातील जास्तीत जास्त स्नायू आकुंचन-प्रसरण पावत राहतील, असा व्यायाम योग्य होय. त्यामुळे धावणे, डोंगर चढणे, दोरीवरच्या उड्या मारणे, सायकल चालविणे, होडी वल्हवणे, जोर-बैठका मारणे हे सर्व व्यायाम प्रकार उत्कृष्ट व्यायाम देतात. 

अशा व्यायामानंतर विश्रांतीच्या काळात हृदयात योग्य ते बदल होऊ लागतात. हृदयाचा आकार हळूहळू वाढू लागतो. सामान्यतः हृदयाचा आकार साधारणतः ७०० मिलिलिटर एवढा असतो. पण, एडी मर्क्‍स या बेल्जियम सायकलपटूच्या हृदयाचा आकार १८०० मिलिलिटर एवढा होता. तो मिनिटाला ६००० मिलिलिटर एवढा प्राणवायू शरीरात घेऊ शकत होता. आकार वाढल्याने नाडीचे ठोके कमी पडू लागतात. कारण, हृदयाची कार्यक्षमता वाढल्याने तेवढेच काम हृदय कमी ठोक्‍यांत करू शकते. ताकदवान माणूस १०० किलोचे पोते एकदम उचलून ठेवू शकतो. कमी ताकदीचा माणूस तेच वजन १० वेळा १० किलोप्रमाणे ठेवतो, त्याप्रमाणे हृदयाची कार्यक्षमता वाढते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News