देशातील सर्वोच्च रुग्णालयात नर्सिंग कोर्सची संधी;  वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 August 2020

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता बी. एस्सी नर्सिंग प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले.

नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च एम्स रुग्णालयामध्ये बीएस्सी नर्सिंग करण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता बी. एस्सी नर्सिंग प्रवेशाचे समुपदेशन वेळापत्रक जाहीर झाले. पाच ऑगस्ट २०२० सकाळी अकरा पासून ते १० ऑगस्ट २०२० सायंकाळी पाच वाजेपर्यंत रुग्णालयाचा पसंती क्रमांक आणि विषयाची निवड करता येणार आहे. यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंती क्रमांकावर नर्सिंगच्या जागांसाठी लिस्ट लावली जाईल आहे. सामाजिक आरक्षण ओपन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग, दिव्यांग यानुसार पदाचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे.

देशातील नवी दिल्ली, भोपाळ, भुवनेश्वर, जोधपूर, नागपूर, रायपूर, ऋषिकेश या शहरात एम्सचे एकुण सात रुग्णालय आहेत. त्यात बी, एस्सी नर्शिंगच्या एकूण १२४ जागा उपलब्ध आहेत, त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरची इंट्रन्स परीक्षा दरवर्षी घेतली जाते. या परीक्षेचा निकाल जुन महिन्यात जाहीर करण्यात आला. आता उमेदवारांना कौन्सिलिंग केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल.

बी. एसस्सी प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक

  • समुपदेश आणि विषय निवड : ५ ऑगस्ट २०२० सकाळी ११ वाजता सुरु. १० ऑगस्ट २०२० सायंकाळी ५ पर्यंत
  • प्रमाणपत्र पडताळणी :  १३ ऑगस्ट २०२० सकाळी ११ वाजता सुरु. १४ ऑगस्ट २०२० सायंकाळी ५ पर्यंत
  • आरक्षणानुसार रिक्त जागांची यादी जाहीर : १८ ऑगस्ट २०२० 
  • पहिली यादी :  १८ ऑगस्ट २०२० सकाळी ११ वाजता जाहीर केली जाईल आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश सुरु होईल.
  • प्रमाणपत्र सादर करणे आणि प्रवेश फी भरणे : २५ ऑगस्ट २०२० सायंकाळी ५ पर्यंत
  • दुसरी यादी : २८ ऑगस्ट २०२० सकाळी ११ वाजता जाहीर केली जाईल आहे. 
  • प्रमाणपत्र सादर करणे आणि प्रवेश फी भरणे : ०२ सप्टेंबर २०२० सायंकाळी ५ पर्यंत
  • अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News