विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम एनएसएसचा कार्यक्रम अधिकारी करू शकतो
दारू पिणारे, गुंडगिरी करणारे, शिक्षकांची टिंगल करणाऱ्या विद्यार्थ्यांना पथनाट्यामध्ये सहभागी कारून घेतलं. बाकीचे म्हणायचे या टुकार पोरांना तू घेऊन काय करतो, बाकीच्या आलेल्या मुली पण पळून जातील. पण नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा तुम्ही नेतृत्व गुण निर्माण करता तेव्हा माणूस घडतो. शिक्षणशात्राचा प्राध्यापक म्हणून मी जे करू शकतो त्यापेक्षा अधिक मी एनएसएसच्या माध्यमातून काम केले आहे.
ओळख एनएसएसचीः डाॅ पंकजकुमार नन्नवरे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना तथा प्रभारी संचालक, विद्यार्थी विकास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम एनएसएसचा कार्यक्रम अधिकारी करू शकतो
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे शिक्षण शास्त्र विभाग प्रमुख म्हणून डाॅ पंकज नन्नवरे सर हे काम करत आहेत. हिवाळी शिबिराच्या आयोजनापासून सुरुवात करत एनएसएसच्या संचालक पदाची जबाबदारी २०१२ मध्ये त्यांनी स्वीकारली.आज जळगाव, धुळे, नंदुरबार भागात सुमारे १५५३० एनएसएस स्वयंसेवक आहेत आणि २४९ कार्यक्रम अधिकारी आहेत.
महात्मा गांधींनी सांगितलं होता कि खेड्याकडे चला. या सगळ्याला ५० वर्ष झाली. या संदर्भात मी चाळीसगाव तालुक्यात दोन शिबिरे घेतली. विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन त्यांची लीडरशीप तयार केली. अलिकडे बघण्यात येत की तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. राजकीय व्यक्ती त्याचा उपयोग करून घेतात. बारावी पास विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा ते थोडे गुंड प्रवृत्तीचे असतात. पण याच विद्यर्थ्यांना जर एनएसएसमध्ये आणले तर त्यांच्यातील सुप्त गुण बाहेर येतात. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचं काम एनएसएसचा कार्यक्रम अधिकारी करू शकतो.
दारू पिणारे, गुंडगिरी करणारे, शिक्षकांची टिंगल करणाऱ्या विद्यार्थ्यांना पथनाट्यामध्ये सहभागी कारून घेतलं. बाकीचे म्हणायचे या टुकार पोरांना तू घेऊन काय करतो, बाकीच्या आलेल्या मुली पण पळून जातील. पण नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा तुम्ही नेतृत्व गुण निर्माण करता तेव्हा माणूस घडतो. शिक्षणशात्राचा प्राध्यापक म्हणून मी जे करू शकतो त्यापेक्षा अधिक मी एनएसएसच्या माध्यमातून काम केले आहे.
ग्रामीण भागातील मुलांमध्ये खूप कौशल्य (स्किल्स) असतात, पण त्यांना बोलता येत नाही. या विद्यार्थ्यांनी स्वतःपुरतं मर्यादित न राहता इतरांनाही तयार करावे. तुमचं बोलणं जर चांगलं असेल तर सगळं जग जिंकता येत. माझे काही विद्यार्थी रिक्षा चलवणारे, दारू पिणारे होते. एनएसएसच्या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर त्यांच्यात झालेला बदल त्यांनी स्टेजवर येऊन सांगितला. ही प्रामाणिक पणाची भावना आहे. हे जे परिवर्तन आहे, कर्तव्याची जाण असणे महत्वाचे.
लाॅकडाऊनच्या पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत आम्ही खूप वेबिनार घेतले.ज्या विद्यार्थ्यांचे पालक टेलरिंगचं काम करतात त्यांच्याकडून आम्ही २५०००० मास्क बनवून घेतले. महाराष्ट्र आंध्रश्रध्द निर्मूलन समिती आणि एनएसएस विभागातर्फे आम्ही घडू देशासाठी हा ५ दिवसाचं ऑनलाईन युवा संवाद घेतला. मला स्वतःला वेबिनार कसा घ्यायचा हे कळत नव्हतं किंवा गुगल फॉर्म कसा भरावा, गुगल मीटवर कस यावं, झूम मीटिंग कशी आयोजित करावी हे मला कळत नव्हतं. पण आज मी वेबिनार घेतो.
कोरोनामुळे हे शिकण्याची संधी मला मिळाली. नंदुरबार जिल्ह्यात बांबू मीशन केले. कोव्हिडच्या काळामध्ये अनेकांना नोकरी नाही आणि आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे पालघर भागातील आदिवासींकडून बांबूपासून राख्या बनवून घेतल्या व त्यांना त्यातून रोजगार निर्माण करून दिला.