आता तुम्हाला मिळणार कॉफी इन "सीसीडी'  

शैलेश पेटकर
Wednesday, 24 April 2019

"कॉफी तो बहाना है... 
दोस्तो के साथ कुछ वक्त बिताना है...' 

सांगली -  कट्ट्यावरच्या गप्पांचा अड्डा कुठं हरवला कोण जाणे. हल्ली भेटणं दुर्मिळच. भेटले तरी घाईघाईत... पण, त्यातूनही जराचा वेळ काढून आता कॉफीच्या कपाबरोबर गप्पांचा फड रंगवण्याचं एक "क्‍लास' ठिकाण म्हणून "कॅपे कॉफी डे', शॉर्ट कटमध्ये सीसीडी फेमस व्हायला लागलं आहे. 

"कॉफी तो बहाना है... 
दोस्तो के साथ कुछ वक्त बिताना है...' 

सांगली -  कट्ट्यावरच्या गप्पांचा अड्डा कुठं हरवला कोण जाणे. हल्ली भेटणं दुर्मिळच. भेटले तरी घाईघाईत... पण, त्यातूनही जराचा वेळ काढून आता कॉफीच्या कपाबरोबर गप्पांचा फड रंगवण्याचं एक "क्‍लास' ठिकाण म्हणून "कॅपे कॉफी डे', शॉर्ट कटमध्ये सीसीडी फेमस व्हायला लागलं आहे. 

कॉलेजचा एरिया म्हणून फेमस झालेल्या सांगली-विश्रामबागमध्ये या सीसीडींचे आता चांगलेच प्रस्थ तयार झाले आहे.  इंग्रज गेले, मात्र काही सवयी मागे ठेवल्या. त्यात चहा अन्‌ कॉफी. पूर्वी स्पेशल पाहुणा घरी आला तर "कॉफी' केली जायची. 

चहा घेणार की कॉफी, असं विचारणं म्हणजे "फॉर्मेलिटी' म्हटली जाते. अन्‌ थोडा विचार करून "कॉफी' चालेल, असं उत्तर देण्यातही कोण जाणे काय मोठेपणा असतो... पण "कॉफी' हे काहीअंशी स्टेटस सिम्बॉलचं पेय म्हणून ओळखलं जातं, हे नाकारून चालणार नाही. आता कॉफी कुठं पिली जाते, यावर बरचं काही अवलंबून आहे. 

कॉलेजकुमारांसाठी शक्‍यतो कुणी फिरकणार नाही असा अड्डा महत्त्वाचा असतो. आईस्क्रीम पार्लरची चलती होती ती त्यामुळेच. पण, तिथेही वर्दळ वाढली. प्रायव्हसी मिळेना झाली. मग पाय वळायला लागले "सीसीडी'कडे... आता तिथंही "वेटिंग' सुरू झालंय हे वेगळं सांगायला नको. कॉलेजचा ब्रेक असो वा नसो, कॅन्टीनमध्ये जाऊन गरमगरम कॉफी पिण्यात प्रत्येकालाच एक आनंद वाटतो.

सांगली शहरातदेखील अशा सीसीडीचे प्रस्त सध्या वाढत चालले आहे. दहा सीसीडी सुरू झाल्यात. इथे मस्त शानदार महालात बसल्याप्रमाणे वाटते. आकर्षक इंटेरियर, मुलायम पांढऱ्या कपडाने झाकलेली गोल टेबलं, मंद प्रकाश, गोड बॅकराऊंड म्युझिक... मन हरखून आणि हरवून जातं. कॉफीची टेस्टही न्यारीच. इथं जाताना खिसा गरम असावा लागतो, हे मात्र नक्की. बाहेर 10-15 रुपयांना मिळणारी कॉफी प्यायला सीसीडीत शंभर रुपयांची नोटही कमी पडते. पण सीसीडीत गेल्यानंतर "मनी डझंट मॅटर' अशी प्रत्येकाची भूमिका असते. 

कॉफी शॉप्स्‌ गर्दीने फुललेली दिसतात. फेसाळत्या कॉफीचा ग्लास हातात घेऊन एकमेकात गुंग असणाऱ्या या तरुणाईला या सीसीडी आता सवयीची व्हायला लागलीय.  कॉफी हाऊसमध्ये बसून कॉफी पिणं हा "कॉलेज लाइफ'चा एक पार्ट होऊ लागला आहे. कॉफीचा आस्वाद घेत, रस्त्यावरची गर्दी न्याहळत आजूबाजूला चाललेल्या गोष्टीची मजा एकदा तरी घेतलीच पाहिजे. त्यामुळे दिवस कॉफीमय झाल्याचा आनंदही मिळवता येतो. सध्या कॉफी हे फक्त पेय नसून, तरुणाईच्या संस्कृतीचा भाग बनत चालला आहे.   

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News