कमळाला चिखलात ठेऊन आम्ही आमचं फूल फुलवणार... घटक पक्षांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • घटक पक्षांनी भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढवावी, अशी भाजपची इच्छा
  • रासप’ने स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांचीही मागणी - जानकर

मुंबई - आगामी निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या (रासप) चिन्हावरच लढवल्या जातील, अशी माहिती पक्षाचे अध्यक्ष व मंत्री महादेव जानकर यांनी आज मंत्रालयात बोलताना दिली. विधानसभेची आगामी निवडणूक घटक पक्षांनी भाजपच्या कमळाच्या चिन्हावर लढवावी, अशी भाजपची इच्छा आहे.

भाजपच्या आवाहनाला प्रतिसाद देताना रयत क्रांती संघटनेचे नेते व मंत्री सदाभाऊ खोत यांनी कमळाच्या चिन्हावर लढू, असे म्हटले आहे. तर, ‘शिवसंग्राम’चे विनायक मेटे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढली होती. पक्षाचे अस्तित्व कायम राहिले पाहिजे.

तसेच प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवायचा असेल, तर स्वतंत्रपणे पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवणे गरजेचे आहे. ‘रासप’ने स्वतंत्रपणे निवडणुका लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांचीही मागणी आहे, असे जानकर म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News