आता "सकाळ बिमा'सोबत व्यवसाय करण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 14 September 2020

आता "सकाळ बिमा'सोबत व्यवसाय करण्याची संधी

आता "सकाळ बिमा'सोबत व्यवसाय करण्याची संधी

सकाळ मनी'चं व्यवसायिक रोपटं आता वाढायला सुरूवात झाली आहे. तसेच "सकाळ बिमा'सोबत एकाच छताखाली देशातील सर्व (लाईफ, हेल्थ आणि जनरल) विमा कंपन्यांसोबत व्यवसाय करण्याची तुरूणांना सुवर्णसंधी मिळत आहे. ज्या तरूणांना यामध्ये सहभागी व्हायचं आहे, त्यांनी "पॉईंट ऑफ सेल्स पर्सन' (पीओएसपी) म्हणून सहभागी व्हावं असं आवाहन सकाळकडून तरूणांना करण्यात आलं आहे.

"सकाळ बिमा' हा बहुचर्चित असा नामवंत ब्रॅंड आहे. तसेच "सकाळ बिमा' कडून देशातील सार्वजनिक; तसेच खासगी क्षेत्रातील सर्वच विमा कंपन्यांशी भागीदारी करण्यात आली आहे. याचा फायदा कर सल्लागार, वित्तीय सल्लागार, विमा व गुंतवणूक प्रतिनिधी, चार्टर्ड अकाउंटंट आणि इच्छूकांना घेता येणार आहे. त्यासाठी  "पॉईंट ऑफ सेल्स पर्सन' (पीओएसपी) म्हणून सहभागी व्हावं असं सकाळकडून तरूणांना आवाहन करण्यात आलं आहे.

व्यवसायिक भागीदार झाल्यानंतर 'हा' होणार फायदा

- विमा काढण्यासाठी सुसज्ज असे मोबाईल ऍप्लिकेशन.
- विक्री आणि विपणनाच्या (मार्केटिंग) संदर्भात संपूर्ण सहकार्य.
- कमिशनच्या स्वरूपात नियमित उत्पन्न.
- आयुष्यभराच्या उत्पन्नाची तजवीज
- नियमित कमिशनव्यतिरिक्त इतरही आकर्षक लाभ.
- तुमच्या कामाचे "बॉस' तुम्हीच व्हाल!

या संधीचा लाभ घेण्यासाठी 73508 73508 या मोबाईल क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्या.

"सकाळ बिमा'ची लवकरचं वेबसाईट येणार असून त्यामध्ये सकाळ बीमा संदर्भात अधिक माहिती असेल. 'सकाळ बीमा' या वेबसाईटच्या माध्यमातून लाईफ, हेल्थ व जनरल इन्श्‍युरन्स कंपन्यांच्या योजना प्रत्यक्ष विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे वेबसाईटच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना विमा घेता येणार आहे. त्याचबरोबर, "पीओएसपी' आपल्या ग्राहकांसाठी विविध योजनांची तुलना करू शकतील. ही माहिती ग्राहकाला व्हॉट्‌सऍप किंवा ई-मेलच्या माध्यमातून सहजपणे पाठवू शकतील.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News